कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीय? मग करा हे काम, रहाल फिट अँड फाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 02:06 PM2022-01-19T14:06:43+5:302022-01-19T14:09:14+5:30

कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यासाठी तज्ज्ञ, डॉक्टरांनी अनेक उपाय सुचवले आहेत. रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यासाठी पुरेशी झोप (Sleep) गरजेची असते.

sleep properly to increase your immunity during corona | कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीय? मग करा हे काम, रहाल फिट अँड फाईन

कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीय? मग करा हे काम, रहाल फिट अँड फाईन

Next

गेल्या दोन वर्षांपासून जगभरातले नागरिक कोरोनाशी (Coronavirus) सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, तसंच संसर्ग झाला तरी प्रकृती गंभीर होऊ नये, यासाठी सर्वदूर लसीकरणावर (Corona Vaccination) भर दिला जात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचे नवे व्हेरिएंट्स (Corona Variant) आढळून आले आहेत. यात अल्फा, बीटा, डेल्टा आदींचा समावेश आहे. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा ओमिक्रॉन (Omicron) हा नवा व्हॅरिएंट आढळून आला. हा व्हेरिएंट जास्त धोकादायक नसला तरी त्याचा संसर्ग वेगाने पसरतो, असं स्पष्ट झालं आहे. कोणत्याही संसर्गजन्य आजाराचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती (Tips to increase Immunity) हा घटक महत्त्वाचा ठरतो. कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यासाठी तज्ज्ञ, डॉक्टरांनी अनेक उपाय सुचवले आहेत. रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यासाठी पुरेशी झोप (Sleep) गरजेची असते.

सध्याच्या काळात बहुतांश जणांना रात्री उशिरापर्यंत लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाइलवर काम करण्याची किंवा सर्फिंग करण्याची सवय असल्याचं दिसून येतं. यामुळे त्यांच्या झोपेच्या पॅटर्नवर (Sleeping Pattern) परिणाम होतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती हळूहळू कमकुवत होऊ लागते. एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झाल्यास डॉक्टर अशा व्यक्तीला पुरेशा प्रमाणात झोप घेण्याचा सल्ला देतात. कारण पुरेशी झोप रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते. चांगली झोप शरीराला डिटॉक्स (Detox) करण्याचं काम करते.

दररोज पुरेशा प्रमाणात झोप घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढतेच; पण त्यामुळे स्ट्रेस हॉर्मोन्सही (Stress Hormones) कमी होतात. चयापचय क्रिया सुधारते, प्रजननक्षमतादेखील (Fertility) वाढते. पुरेशा झोपेमुळे डोळ्यांचे विकार, पित्ताचा त्रास होत नाही. काही अहवालांनुसार, पुरेशी झोप घेतल्यास डायबेटीस आणि हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) नियंत्रणात राहतं. योग्य आहाराच्या माध्यमातून केवळ रोगप्रतिकारशक्ती मजबूत करता येते. परंतु, पुरेशा प्रमाणात चांगली झोप घेतल्यास अनेक शारीरिक समस्या दूर होण्यासही मदत होते.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी झोप उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकते. 'लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्यसंपदा लाभे' असं आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे. ते अंमलात आणणं ही सर्वार्थाने यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

Web Title: sleep properly to increase your immunity during corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.