पुण्याचं ब्रिटीश कालीन भाटघर धरण १०० टक्के भरलं; ११७१ क्युसेसनं विसर्ग सुरु, निरानदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 01:13 PM2021-09-12T13:13:55+5:302021-09-12T13:21:14+5:30

गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असल्यानं धरण २१ दिवस उशिराने भरलं

Pune's British-era Bhatghar Dam is 100 per cent full; Visarga begins with 1171 cusecs, a warning to the villages on the banks of Nirandi | पुण्याचं ब्रिटीश कालीन भाटघर धरण १०० टक्के भरलं; ११७१ क्युसेसनं विसर्ग सुरु, निरानदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

पुण्याचं ब्रिटीश कालीन भाटघर धरण १०० टक्के भरलं; ११७१ क्युसेसनं विसर्ग सुरु, निरानदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

googlenewsNext
ठळक मुद्देभोर तालुक्यात भाटघर धरणातील पाण्याच विहंग दृष्य पाहण्यास पर्यटकांची गर्दी

भोर : ब्रिटिश कालीन दगडी भाटघर धरणं १०० टक्के भरलं असून धरणाच्या ४५ स्वयंचलीत ४५ पैकी ११ स्वयंचलित दरवाजातून ११७१ क्युसेसने प्रती सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे निरानदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असल्यानं धरण २१ दिवस उशिराने भरलं आहे. भाटघर धरणचा पाणीसाठा २४ टीएमसी आहे. धरणाला एकूण ८१ दरवाज्यांपैकी ४५ दरवाजे स्वयंचलित असून ३६ दरवाजे रोलिंगचे आहेत. यातून प्रतिसेकंदाला ५६००० क्युसेसने एकाचवेळी पाणी बाहेर पडते. 

 धरणाच्या ४५ पैकी ११ स्वयंचलीत दरवाजातून ८ हजार क्युसेसने पाण्याचा विर्सग सुरु होता. माञ पाऊस कमी झाल्याने सध्या ११७१ क्युसेसने पाण्याचा विर्सग सुरु आहे. भाटघर धरण मागील वर्षी २१ ऑगस्टला भरलं होतं. ३ जिल्ह्यातील ९ तालुक्यातील २ लाख ५० हजार हेक्टर शेतीला या पाण्याचा फायदा होणार आहे. पुर्वेकडील नागरीकांची भविष्यात पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न मिटला आहे. यामुळे नागरिक सुखावले आहेत 

 

पाणी पाहण्यास पर्यटकांची गर्दी 

भोर तालुक्यात भाटघर धरण १०० टक्के भरल्यानं धरणाच्या मोऱ्यातून पाण्याचा विर्सग सुरु आहे. हे दृश्य पाहण्यासाठी भोर तालुक्यात व बाहेरील नागरिक पडणाऱ्या पाण्याचे विहंग दृष्य पाहण्यासाठी एकच गर्दी करत आहेत.

Web Title: Pune's British-era Bhatghar Dam is 100 per cent full; Visarga begins with 1171 cusecs, a warning to the villages on the banks of Nirandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.