पूर्वा गोखलेचा पहिला सिनेमा 'या' तारखेला येणार रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 01:33 PM2020-02-24T13:33:10+5:302020-02-24T13:41:04+5:30

'भयभीत' चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे व पूर्वा गोखेले बऱ्याच वर्षांनी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

Poorva Gokhale 1st marathi Movie BhayBheet All Set To Released | पूर्वा गोखलेचा पहिला सिनेमा 'या' तारखेला येणार रसिकांच्या भेटीला

पूर्वा गोखलेचा पहिला सिनेमा 'या' तारखेला येणार रसिकांच्या भेटीला

googlenewsNext

गूढ भास आणि अनाकलनीय गोष्टींची अनामिक भीती कायम मनाला असते. या भीतीमागे काही गुपितंही दडलेली असतात. काहींसाठी ते भास असतात काहींसाठी भासापलीकडे बरंच काही. याच भास-आभासाचा अनुभव अनेकांना आलेला असतो ज्यातून तयार होतात काही अगम्य आणि गूढ गोष्टी.

 

आयुष्यात घडणाऱ्या काही चमत्कारिक गोष्टी आणि त्यांचा मागोवा घेताना निर्माण होणारे गूढ   याचा अनपेक्षित अनुभव देणारा ‘भयभीत’ हा चित्रपट २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


सुबोध भावे, पूर्वा गोखले, गिरीजा जोशी, मधू शर्मा, मृणाल जाधव, यतीन कार्यकर आदि कलावंत असणार आहेत. 'भयभीत'  चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे व पूर्वा गोखेले बऱ्याच वर्षांनी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. मराठी सिनेमांसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी मृणाल जाधव ही चुणचुणीत बालकलाकार या चित्रपटात आहे. भोजपूरी चित्रपटात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मधू शर्मा ही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. रहस्यमय घटना आणि मानवी नातेसंबंध याद्वारे कथानकात निर्माण करण्यात आलेली या सिनेमातील गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे.

अविनाश रोहरा, पवन कटारिया, समीर आफताब, प्रभाकर गणगे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. कलादिग्दर्शन एकनाथ राणे तर साऊंड डिझायनर सतीश पुजारी आहेत. गीतकार मंदार चोळकर असून संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी नकाश अझीज यांनी सांभाळली आहे. अर्जित सिंग व मीनल जैन–सिंग यांनी चित्रपटातील गीते स्वरबद्ध केली आहेत. कथा एस.ए तर पटकथा आणि संवाद दिनेश जगताप यांचे आहेत. 

Web Title: Poorva Gokhale 1st marathi Movie BhayBheet All Set To Released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.