Next

घोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 11:37 AM2018-05-22T11:37:05+5:302018-05-22T12:06:08+5:30

विशाल हळदे  मुंबईसारख्या महानगरांची तहान भागवणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरण. याच धरणाशेजारी असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील पाड्यांवर राहणा-यांना मात्र घोटभर पाणी ...

विशाल हळदे मुंबईसारख्या महानगरांची तहान भागवणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरण. याच धरणाशेजारी असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील पाड्यांवर राहणा-यांना मात्र घोटभर पाणी मिळावे म्हणून जीवघेणी पायपीट करावी लागते. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हातान्हात या गावांमध्ये येणा-या टँकरचे पाणी मिळवण्यासाठी महिलांसह चिल्ल्यापिल्ल्यांचीही गर्दी होते. घसा कोरडा पडलेल्या विहिरींतील पाषाणात एखादा पाझर फुटेल, या आशेने खोदकाम सुरूच असते. एखाद्या विहिरीत ओंजळभर पाणी दिसले तरी विहिरीत उतरण्याची कसरत दिसते. 

टॅग्स :ठाणेthane