Afghanistan crisis : निर्दयी तालिबान, माजी उपराष्ट्रपतींच्या भावाची गळा चिरून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 08:38 AM2021-09-11T08:38:53+5:302021-09-11T08:39:12+5:30

Afghanistan crisis : रोहुल्लाह सालेह हे तालिबानच्या तावडीत सापडल्यानंतर तालिबानने त्यांची क्रूरपणे हत्या केली. त्यांना चाबकाचे फटके मारले, वीजेच्या तारांनी मारहाण करुन गळा कापला.

Afghanistan crisis : Brutal Taliban, former vice president's brother strangled to death | Afghanistan crisis : निर्दयी तालिबान, माजी उपराष्ट्रपतींच्या भावाची गळा चिरून हत्या

Afghanistan crisis : निर्दयी तालिबान, माजी उपराष्ट्रपतींच्या भावाची गळा चिरून हत्या

Next
ठळक मुद्देपंजशीरमध्ये तालिबान आणि नॅशनल रेझिस्टंस फोर्समध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे. तालिबानला पाकिस्तानची मदत मिळत असल्याने ते हळूहळू पंजशीरमध्ये पुढे सरकत आहेत.

पंजशीर खोरे ताब्या घेण्यासाठी तालिबान अधिकच आक्रमक झाले असून अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांच्या भावाची तालिबाननं निर्घृण हत्या केली आहे. अत्यंत निर्दयीपणे गळा चिरून आणि त्यानंतर त्यांना गोळ्या घालून सालेह यांच्या भावाला ठार करण्यात आलं आहे. दुसरीकडे आंदोलनकर्त्यांवरही गोळीबार सुरू असून आत्तापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तालिबानच्या या पाशवी कृत्यानं अफगाणिस्तानमध्ये दहशत पसरल्याचं चित्र आहे. 

पंजशीरमध्ये तालिबान आणि नॅशनल रेझिस्टंस फोर्समध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे. तालिबानला पाकिस्तानची मदत मिळत असल्याने ते हळूहळू पंजशीरमध्ये पुढे सरकत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमरुल्लाह सालेह ताजिकिस्तीनमध्ये पळून गेले होते. सालेह यांनी नेहमीच तालिबानला आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी आपणच अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं. पंजशीरमधून ते तालिबानविरोधातील लढ्यात सहभागी झाले होते. त्यानंतर, आता त्यांचे भाऊ रोहुल्लाह सालेह यांची तालिबानकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

रोहुल्लाह सालेह हे तालिबानच्या तावडीत सापडल्यानंतर तालिबानने त्यांची क्रूरपणे हत्या केली. त्यांना चाबकाचे फटके मारले, वीजेच्या तारांनी मारहाण करुन गळा कापला. रोहुल्लाह हे पंजशीरमधून काबुलला जाण्याच्या तयारीत होते. तालिबान्यांना याचा सुगावा लागताच त्यांना चारही बाजूंनी घेरले. दरम्यान, याबाबत अद्याप अमरुल्लाह यांची कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. 
 

Web Title: Afghanistan crisis : Brutal Taliban, former vice president's brother strangled to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.