पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:31 PM2019-06-01T23:31:14+5:302019-06-01T23:31:23+5:30

पूर्ववैमनस्यातून २३ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास सिडको वाळूजमहानगरातील साईनगरात घडली.

Prejudice | पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला

पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला

googlenewsNext

वाळूज महानगर : पूर्ववैमनस्यातून २३ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास सिडको वाळूजमहानगरातील साईनगरात घडली. यात प्रशांत आमटे हा गंभीर जखमी झाला असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रशांत संपत आमटे हा शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास सिडको वाळूज महानगरातील एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी गेला होता. चहा घेतल्यानंतर तो हॉटेलसमोर उभा असताना चेतन सोनवणे, मंगेश काशिंदे व दीपक साखरे हे तिथे आले.

तिघांनी मारहाण करीत चेतनने प्रशांतवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेला प्रशांत घरी गेल्यानंतर त्याला भाऊ प्रमोद आमटे व मित्र कृष्णा कळंत्रे याने शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी प्रशांत आमटे याच्या तक्रारीवरुन चेतन सोनवणे, मंगेश काशिंबे व दीपक साखरे या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Prejudice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.