मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये  ६ जूनला ‘शासन आपल्या दारी’, पालकमंत्र्यांनी सूक्ष्म नियोजनाच्या दिल्या सूचना

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 1, 2023 07:19 PM2023-06-01T19:19:18+5:302023-06-01T19:19:42+5:30

आरोग्य विभागाने सतर्क राहून जबाबदारी पाळावी

In the presence of the Chief Minister, on 6th June in Kudal Government is at your door | मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये  ६ जूनला ‘शासन आपल्या दारी’, पालकमंत्र्यांनी सूक्ष्म नियोजनाच्या दिल्या सूचना

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये  ६ जूनला ‘शासन आपल्या दारी’, पालकमंत्र्यांनी सूक्ष्म नियोजनाच्या दिल्या सूचना

googlenewsNext

सिंधुदुर्ग : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ६ जून रोजी कुडाळ येथे होणाऱ्या जिल्ह्याच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करा, विशेषत: आरोग्य विभागाने सतर्क रहावे, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी ६ जून रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या संभाव्य दौऱ्याच्या नियोजनाबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे गुरूवारी बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सुरुवातीला नियोजनाबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, आरोग्य मेळावा, रोजगार मेळावा, आरोग्य तपासणी शिबिर याबरोबरच विविध विभागांच्या स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय वाहनतळ, उपस्थितांसाठी फूड पॅकेट, पाणी, सोबत ओआरएसचे सॅशे, टॉयलेट आदी बाबतही नियोजन करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने सतर्क राहून जबाबदारी पाळावी

पालकमंत्री चव्हाण म्हणाले, सद्याचे ऊन आणि संभाव्य पाऊस याची दक्षता घेवून त्याबाबत काटेकोर नियोजन करा. येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आरोग्य कक्ष उभा करुन सुसज्ज रुग्णवाहिका आवश्यक वैद्यकीय पथक, कर्मचारी, परिचारिका यांना तैनात ठेवा. आरोग्य विभागाने सतर्क राहून जबाबदारी पार पाडावी. येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी फिरत्या शौचालयांचीही सोय करा.

आवश्यक सुविधा मिळण्यासाठी लक्ष ठेवा

पालकमंत्री म्हणाले, खासगी वाहनांसाठी वाहन तळाची सुविधा करा तसेच अग्निशमन दलाची वाहनेही उपलब्ध ठेवा. उपस्थित लाभार्थी, पोलिस कर्मचारी यांना पाणी, जेवण याची सुविधा जागेवरच मिळेल याबाबतही दक्षता घ्या. सर्वच यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करावे. आवश्यक त्या सर्व सुविधा उपस्थितांना मिळतील याकडे लक्ष ठेवून हा कार्यक्रम यशस्वी करा, असेही ते म्हणाले.

Web Title: In the presence of the Chief Minister, on 6th June in Kudal Government is at your door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.