'ज्यांच्या मनात मेळाव्याबाबत शंका होती त्यांनी डोळे उघडून जनसमुदाय बघावा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 03:31 PM2021-10-15T15:31:57+5:302021-10-15T15:42:30+5:30

'पंकजाताई म्हणजे देवीचं सोज्वळ, मायाळू, सहनशील रुप'

pritam munde speech in bhagwangarh dasara melava, 'Those who had doubts about the rally should open their eyes and look at the crowd' | 'ज्यांच्या मनात मेळाव्याबाबत शंका होती त्यांनी डोळे उघडून जनसमुदाय बघावा'

'ज्यांच्या मनात मेळाव्याबाबत शंका होती त्यांनी डोळे उघडून जनसमुदाय बघावा'

googlenewsNext

बीड: आज दसऱ्याच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील भगवान गडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळी मोठ्या जल्लोषात मेळाव्या आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात खासदार प्रीतम मुंडेंनी पहिल्यांदा भाषणाला सुरुवात केली. प्रीतम मुंडे भाषणासाठी येताच कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. तर, प्रीतम यांनी मंडे टू संडे अशी हाक दिली. त्यावर कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे असं म्हणाले.

आपल्या भाषणात प्रितम मुंडे म्हणतात की, लांबलचक भाषणं करायला मला आवडत नाही. आपला आवाज फक्त बीड जिल्हा किंवा मुंबईपर्यंत नाही तर दिल्ली पर्यंत पोहोचतो. सावरगावच्या गावकऱ्यांचं आभार व्यक्त करते. आज या मेळाव्याला येत असताना गेल्या काही दिवसांपूर्वी इतकी अतिवृष्टी झाली की काही लोकांच्या मनात शंका होती की मेळावा होईल का नाही? किती मोठी होईल? ज्या लोकांच्या मनात शंका होती त्या लोकांना सांगायचं आहे, जरा डोळे उघडून बघा. रसाळलेला जनसमुदाय बघा. हा भगवान बाबांचा आशीर्वाद आणि मुंडे साहेबांच्या संस्कारांचा प्रतिक आहे.

त्या पुढे म्हणतात, आज दसऱ्याचा दिवस आहे, विजयादशमीचा दिवस आहे, नवरात्रीचा सण हा देवीचा सण म्हणून साजरा करतो. देवीचे अनेक रुप बघता येतात. देवीचं सोज्वळ, मायाळू, सहनशील रुप आपण बघतो. पंकजा ताई पालकमंत्री असताना हे मायाळू, सोज्वळ आणि सहनशीलरुप आपण बघितलंय. पण नुकतीच दुर्गाष्टमी पार पडली. जेव्हा समाजात आराजकता पसरते, विषमता, अन्याय पसरतो तेव्हा तीच देवी दुर्गेचा अवतार घेऊन त्या अन्यायाला संपविल्याशिवाय राहत नाही. याचंसुद्धा हा विजयादशमीचा सण प्रतिक आहे. त्यामुळे मी आज सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतेय.
 

Web Title: pritam munde speech in bhagwangarh dasara melava, 'Those who had doubts about the rally should open their eyes and look at the crowd'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.