माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 10:37 PM2021-10-19T22:37:52+5:302021-10-19T22:38:46+5:30

सिन्नर : येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा तिघा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. मंगळवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास उघडकीस आली.

Attempt to blow up ATM in Malegaon industrial estate | माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देमाळेगाव औद्योगिक वसाहतीमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी केलेला अयशस्वी प्रयत्न.

सिन्नर : येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा तिघा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. मंगळवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये वेदांत हॉटेलजवळ बँक ऑफ इंडियाचे एटीएम असून सोमवारी (दि.१९) मध्यरात्री २.१५ ते ३.४५ या वेळेत तिघा चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करून एटीएम मशिनची स्क्रीन काढत त्यातील पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनंतरही चोरट्यांना एटीएम फोडण्यात अपयश आल्याने खाली हात परतावे लागले.

सोमवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास परिसरातील व्यावसायिक तसेच रस्त्याने ये-जा करणा-या कामगारांच्या सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सदर एटीएममध्ये पैसे टाकण्याची जबाबदारी असलेल्या आयएसएस पेमेंट सोल्युशन मुंबई या एजन्सीचे व्यवस्थापक सुनील थोरात यांनी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तिघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गरुड करत आहेत.

Web Title: Attempt to blow up ATM in Malegaon industrial estate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.