Ratan Tata: रतन टाटांनी त्यांच्या गुरुचा फोटो शेअर केला; युजर म्हणाले, तुम्ही महान आहात!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 07:22 PM2021-07-29T19:22:58+5:302021-07-29T19:26:33+5:30

Ratan Tata news: हा फोटो 1992 मधील आहे. टाटाची एक एस्टेट स्टेशन वॅगन लाँच झाली होती.

Ratan Tata shared a photo of his guru JRD tata on instagram; User said, you are great! | Ratan Tata: रतन टाटांनी त्यांच्या गुरुचा फोटो शेअर केला; युजर म्हणाले, तुम्ही महान आहात!

Ratan Tata: रतन टाटांनी त्यांच्या गुरुचा फोटो शेअर केला; युजर म्हणाले, तुम्ही महान आहात!

Next

रतन टाटांनी इन्स्टाग्रामवर आज गुरु जेआरडी टाटा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोद्वारे त्यांनी जेआरडींच्या 117 व्या जयंतीनिमित्त आठवणींना उजाळा दिला. (Ratan Tata Shares JRD tata's photo with TATA Estate Car launch on instagram; users reacted )

अवघ्या टाटा समुहाला दानशूरपणाचा वसा देऊन गेले, अल्पायुषी सर रतन टाटा...

हा फोटो 1992 मधील आहे. टाटाची एक एस्टेट स्टेशन वॅगन लाँच झाली होती. रतन टाटा यांनी हा फोटो शेअर करत जेआरडींच्या 117 व्या जयंतीनिमित्त एक आठवणींचा क्षण, आणखी एक आठवण. जेआरडी टाटा यांनी टाटा कार बनविण्याचे स्वप्न पाहिले होते. सुमंत मुळगावकरांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले होते. जेह यांच्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न प्रत्यक्षात आले होते. टेल्कोने देखील भारतासाठी एक स्वप्न साकारले होते.'' सुमंत मुळगावकरांना टाटा मोटर्सचा शिल्पकार म्हटले जाते. 

रतना टाटा नेहमी जेआरडी टाटांची आठवण काढत असतात. त्यांचे फोटो शेअर करत असतात. हा फोटो त्यांनी गेल्या वर्षी शेअर केला होता. 

1991 मध्ये जेआरडी टाटांनंतर रतना टाटांनी टाटा सन्सचा कारभार सांभाळला. या दोघांमध्ये कोणतेही रक्ताचे नाते नव्हते. मात्र, एक खास धागा होता. रतन टाटा त्यांच्या आयुष्यातील रोल मॉडेल जेआरडी टाटांनाच मानतात. 

'मी इंजिनिअरिंग सोडून आर्किटेक्ट बनलो, पण...'; रतन टाटांच्या मनावर आजही मोठे ओझे

रतन टाटा आजही गुरु जेआरडी टाटा यांचा आदर करतात. हे पाहून लोकांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. काही युजरनी लिहीले की ते रेअर मॅन आहेत. तर काहींनी लिहीले की ते महान आहेत.

Web Title: Ratan Tata shared a photo of his guru JRD tata on instagram; User said, you are great!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.