धक्कादायक ! मंदिरात झोपलेल्या मनोरुग्ण महिलेचा गळा चिरुन खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 08:02 PM2021-12-08T20:02:42+5:302021-12-08T20:03:38+5:30

आज पहाटे काही नागरिक मंदिरात आले असता त्यांना मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला.

Shocking! Murder of a mentally ill woman sleeping in a temple | धक्कादायक ! मंदिरात झोपलेल्या मनोरुग्ण महिलेचा गळा चिरुन खून

धक्कादायक ! मंदिरात झोपलेल्या मनोरुग्ण महिलेचा गळा चिरुन खून

Next

नांदेड : शनि मंदिरात झोपलेल्या एका मनोरुग्ण महिलेचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी लोहा येथे उघडकीस आली. छबुबाई ठाकूर असे मृत महिलेचे नाव आहे. 

लोहा शहरातील छबुबाई ठाकूर या महिला मनोरुग्ण आहेत. नागरिकांच्या माहितीनुसार त्या दिवसभर शहरात फिरून दररोज शनिमंदिरात झोपत. आज पहाटे काही नागरिक मंदिरात आले असता त्यांना छबुबाई यांचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच पोलीस निरिक्षक संतोष तांबे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल कऱ्हे आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. छबुबाई यांचे बंधू रामसिंह गोपासिंह ठाकूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.  

Web Title: Shocking! Murder of a mentally ill woman sleeping in a temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.