बेशरम लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान, संभाजी भिडेंची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 10:23 AM2021-10-15T10:23:14+5:302021-10-15T10:28:02+5:30

'कोरोना हा थोतांड आहे, चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे.'

sambhaji bhides controvertial statement over india and indian people | बेशरम लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान, संभाजी भिडेंची जीभ घसरली

बेशरम लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान, संभाजी भिडेंची जीभ घसरली

Next

सांगली: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे(Sambhaji Bhide) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आज शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौदचा समारोप होता, यानिमित्त बोलताना ते म्हणाले की, 'भारत म्हणजे गुलामी, दास्याच्या नरकात राहणाऱ्या बेशरम लोकांचा, देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे,' असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं.

सांगलीत बोलत असताना संभाजी भिडे म्हणाले की, 'जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश, मग आपल्या देशाचा क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे, कुठल्या गोष्टीत? तो म्हणजे निर्लज्जपणात. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. पण, पारतंत्र्य, गुलामीत राहण्याचा बेशरमपणा असलेल्या बेशरम लोकांचा आपला देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे,' असं संभाजी भिडे म्हणाले.

कोरोना काल्पनिक...
ते पुढे म्हणतात, 'या देशात देशभक्तीचा, जाणिवेचा प्राण नाही. कशासाठी पोटासाठी खंडाळासाठी इतकीच त्याची लायकी आहे. आपला-परका कोण मित्र कोण हे कळत नाही. या देशात कसली सरकार आहे. हा देश जगाचा बाप बनावा, यासाठी मोठी मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती घेतली होती. ती मोहीम पार पाडण्यासाठी आपण मोहीम करतो. पण, मागच्या वर्षी आपल्या या कर्तृत्वसंपन्न शासनाने महाराष्ट्रात कोरोनाचे कारण देत नकार दिला. कोरोना हा काल्पनिक आहे, कोरोना हा ना स्त्री ना पुरुष यांना न होणारा कोरोना आहे. कोरोना हा थोतांड आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे, असंही ते म्हणाले.

Web Title: sambhaji bhides controvertial statement over india and indian people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.