आता ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही - पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 01:03 PM2021-11-23T13:03:16+5:302021-11-23T13:06:55+5:30

पटोले म्हणाले, ओबीसी समाजाने २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान करून केंद्रात सत्ता दिली; पण भाजपने ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी काहीही केले नाही.

Patole says No more injustice to OBCs | आता ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही - पटोले

आता ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही - पटोले

Next

मुंबई : इतर मागास वर्ग (ओबीसी) लोकसंख्येने मोठा आहे, परंतु या समाज घटकाला योग्य न्याय मिळत नाही. संविधानाने जे हक्क दिलेले आहेत, ते समाजाला मिळाले पाहिजेत त्यासाठी संघर्ष करू. आपल्या न्याय हक्क व मागण्यासांठी काँग्रेस पक्ष सदैव आपल्याबरोबर राहील, आता ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या नवनिवयुक्त पदाधिकाऱ्यांचा सोमवारी पदग्रहण कार्यक्रम झाला. त्यास ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, सरचिटणीस देवानंद पवार, सरचिटणीस प्रमोद मोरे, दीप्ती चौधरी पदाधिकारी उपस्थित होते.

पटोले म्हणाले, ओबीसी समाजाने २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान करून केंद्रात सत्ता दिली; पण भाजपने ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी काहीही केले नाही. ओबीसींच्या शिष्यवृत्तीसाठी १९९९ साली आपण आमदार असताना आग्रही मागणी करून त्याचा पाठपुरावा केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ओबीसी समाजातील मुलांना दहावीपर्यंत शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. माजी मंत्री सुनील देशमुख व ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचीही भाषणे झाली.
 

Web Title: Patole says No more injustice to OBCs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.