Last Solar Eclipse of 2021 : ग्रहणकाळात अन्न व पाणी दूषित होऊ नये म्हणून तुळशीच्या पानाचा अवश्य वापर करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 05:40 PM2021-12-03T17:40:44+5:302021-12-03T17:41:35+5:30

Last Solar Eclipse of 2021 : तुळशीच्या पानामुळे अन्न, पाणी दूषित होत नाही आणि ग्रहणकाळ सुटल्यावर ते वापरण्यास योग्य ठरते.

Last Solar Eclipse of 2021: Basil leaves must be used to prevent food and water contamination during the solar eclipse! | Last Solar Eclipse of 2021 : ग्रहणकाळात अन्न व पाणी दूषित होऊ नये म्हणून तुळशीच्या पानाचा अवश्य वापर करा!

Last Solar Eclipse of 2021 : ग्रहणकाळात अन्न व पाणी दूषित होऊ नये म्हणून तुळशीच्या पानाचा अवश्य वापर करा!

Next

४ डिसेंबर रोजी २०२१ वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण आहे. ते भारतातून दिसणार नाही, तरीदेखील ग्रहणकाळाचा प्रभाव मात्र समस्त सजीव सृष्टीवर परिणामकारक ठरतो. म्हणून या कालावधीत विशेषत: अन्न, पाणी दूषित होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.

केवळ ग्रहणातच नाही, तर ग्रहणाच्या आधी तीन ते चार तास वातावरण दूषित होऊ लागते. हा केवळ समज नाही, तर विज्ञानानेदेखील त्याला पुष्टी दिली आहे. त्यालाच शास्त्राने ग्रहणाचा वेध काळ म्हटला आहे. या दूषित वातावरणात अन्न, पाणी निषिद्ध सांगितले जाते. कारण, पृथ्वीला ऊर्जा आणि प्रकाश देणारे चंद्र, सूर्य ग्रहण काळात झाकोळले गेल्यामुळे अन्य सुक्ष्म जीव जीवाणूंचे प्राबल्य वाढते आणि त्यामुळे अन्न, पाणी दूषित होते. म्हणून ग्रहण काळात अन्न, पाणीदेखील वस्त्राने झाकले जाते व त्यात तुळशीचे पान टाकले जाते. तुळशीच्या पानामुळे अन्न, पाणी दूषित होत नाही आणि ग्रहणकाळ सुटल्यावर ते वापरण्यास योग्य ठरते.

निरामय आरोग्यासाठी नित्यसेवन करावी अशी वनस्पती. तिचे महात्म्य एका श्लोकात दिले आहे,

तुलसीकाननं चैव गृहे यस्यावतिष्ठति।
तद्गृहं तीर्थभूतं हि नायांति यमकिंकरा।।

म्हणजे, ज्या घरात, दारात तुळशीचे रोप फोफावले असते, बहरले असते, असे घर म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच आहे. अशा घरात यमाचे दूत म्हणजे रोग, रोगजंतू येत नाहीत. तुळशीचा गंध वाऱ्याने जिथपर्यंत जोतो, तिथपर्यंतच्या दाही दिशातील प्रदेश शुद्ध होतो. रोगजंतुरहित होतो. तुळशीच्या आसपासची दोन मैलांची जागा गंगाजलाइतकी शुद्ध व पावन होते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. 

तुळशी दुसरी संजीवनीच आहे. तिचे नित्य सेवन व्हावे, म्हणून आपल्या पूर्वजांनी तीर्थात तुळशीची पाने टाकून तुळशीउदक प्राशन करण्याची सवय लावून दिली. कारण, तुळशीची पाने टाकलेले तीर्थ नियमित प्राशन करणाऱ्याला ताप व मलेरिया होणार नाही. तुळशीच्या काढ्यामुळे लगेच घाम येऊन ताप उतरतो. घराजवळ तुळशीचे जंगल असेल, तर तिथे वीज पडू शकत नाही, असंही मानतात. आजही ग्रामीण भागात घराबाहेर तुळशी वृंदावन आढळते.

शहरातील फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा छोट्या घरांमध्ये तुळशी वृंदावन शक्य नसले, तरी खिडकीत शोभेच्या रोपांबरोबर तुळशीचे रोप आवर्जून लावले पाहिजे. कारण ते `नॅचरल फिल्टर' आहे. व अशा ग्रहण काळात तिचा आवर्जून उपयोग करावा. 

Web Title: Last Solar Eclipse of 2021: Basil leaves must be used to prevent food and water contamination during the solar eclipse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.