‘या’ क्रिकेटपटूची बहीण लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 02:34 PM2018-06-05T14:34:37+5:302018-06-05T20:04:37+5:30

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या सीजन ११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळणारा गोलंदाज दीपक चहर याने आपल्या खेळातून सर्वांनाच ...

'This' cricketer will be entering Bollywood soon! | ‘या’ क्रिकेटपटूची बहीण लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एंट्री!

‘या’ क्रिकेटपटूची बहीण लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एंट्री!

googlenewsNext
कत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या सीजन ११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळणारा गोलंदाज दीपक चहर याने आपल्या खेळातून सर्वांनाच प्रभावित केले. दीपकची बहीण मालती चहर संपूर्ण आयपीएल सीजनदरम्यान मिस्ट्री गर्ल म्हणून समोर आली होती. यामुळे तिला लोकप्रियताही मिळाली. नुकतीच मालती क्रिकेट अकॅडममध्ये हातात बॅट घेऊन फलंदाजीचा अभ्यास करताना बघावयास मिळाली. ज्याचा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता. आता अशी बातमी समोर येत आहे की, मालती लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. 



मालती आयपीएलच्या संपूर्ण सीजनदरम्यान चेन्नई सुपरकिंग्सला चीअर करताना दिसली. चीअर करतानाचे तिचे काही व्हिडीओदेखील त्यावेळी चांगलेच व्हायरल झाले. यामुळे तिला चांगली प्रसिद्धीही मिळाली. मॅचदरम्यान, आपल्या भावाला चीअर करण्यासाठी मालती स्टेडिअममध्ये न चुकता उपस्थित राहायची. मालती महेंद्रसिंग धोनीचीदेखील मोठी चाहती आहे. त्याला बघण्यासाठीदेखील ती स्टेडिअममध्ये हजार राहायची. 





मालती चहरचा दुसरा भाऊ राहुल चहरने आयपीएल सीजन ११ मध्ये मुंबई इंडियन्सकडून एकही सामना खेळला नाही. त्यामुळे ती एकदाही मुंबई इंडियन्सला चीअर करताना दिसली नाही. दरम्यान, मालतीविषयी सांगायचे झाल्यास ती मिस दिल्ली या स्पर्धेसाठी रनर-अप राहिली आहे. सध्या ती मॉडलिंग करीत आहे. मालतीला बॉलिवूडमध्ये करिअर करायचे आहे. त्यासाठी ती प्रयत्न करतानाही बघावयास मिळत आहे. सूत्रानुसार मालती लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. 

Web Title: 'This' cricketer will be entering Bollywood soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.