जिल्हा परिषदेत पहिल्या दिवशी ५२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:19 AM2021-07-27T04:19:24+5:302021-07-27T04:19:24+5:30

जिल्‍ह्यातील सर्व तालुक्‍यात असणाऱ्या जागांच्‍या समानीकरणानुसार बदल्‍या करण्‍यात येत आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कनिष्‍ठ,शाखा अभियंता पदाच्‍या प्रशासकीय व ...

Transfer of 52 employees on the first day in Zilla Parishad | जिल्हा परिषदेत पहिल्या दिवशी ५२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा परिषदेत पहिल्या दिवशी ५२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Next

जिल्‍ह्यातील सर्व तालुक्‍यात असणाऱ्या जागांच्‍या समानीकरणानुसार बदल्‍या करण्‍यात येत आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कनिष्‍ठ,शाखा अभियंता पदाच्‍या प्रशासकीय व समतोलमध्‍ये ६ तर विनंतीवरुन २ अशा ८ बदल्‍या करण्‍यात आल्‍या आहेत. बांधकाम विभागात २२ बदल्‍या झाल्‍या असून यात कनिष्‍ठ अभियंता प्रशासकीय-२ तर विनंती-२, स्‍थापत्‍य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्‍या प्रशासकीय ११ तर विनंतीवरुन ५ बदल्‍या करण्‍यात आल्‍या तर कनिष्‍ठ आरेखक पदाच्‍या २ बदल्‍या प्रशासकीय कारणावरून करण्‍यात आल्‍या आहेत. कृषी विभागातील ४ बदल्‍या झाल्‍या असून यात कृषी अधिकारी १ तर ३ कृषी विस्‍तार अधिकारी यांच्‍या प्रशासकीय कारणावरुन बदल्‍या करण्‍यात आल्‍या. पशुसंवर्धन विभागात पशुधन पर्यवेक्षक पदाच्‍या २० बदल्‍या झाल्‍या असून यात प्रशासकीय दहा तर विनंतीने दहा बदल्‍यांचा समावेश आहे.

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदासाठी बदली पात्र उमेदवार नसल्‍यामुळे या संवर्गाच्‍या बदल्‍या झाल्‍या नाहीत. लघु पाटबंधारे विभागात बदली पात्र कर्मचारी नसल्‍यामुळे या विभागाच्‍या बदल्‍या झाल्‍या नाहीत. दोघांनी बदलीसाठी विनंती केली होती परंतु पूर्वी काम केलेल्‍या तालुक्‍यात बदली मागितल्‍याने या दोन्‍ही कर्मचाऱ्यांचे अर्ज बाद ठरवण्‍यात आले.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सभागृहात प्रवेश करण्‍यापूर्वी कर्मचाऱ्यांची अँटिजन चाचणी करुनच प्रवेश देण्‍यात आला.

यावेळी जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, उपाध्‍यक्षा पद्मा सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, समाज कल्‍याण सभापती ॲड. रामराव नाईक, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मुख्‍य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे, सामान्‍य प्रशासन विभागाचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांच्‍यासह संबंधित विभागाच्या खाते प्रमुखांची उपस्थिती होती.

आज आरोग्‍य विभागाच्‍या बदल्‍या

सार्वत्रिक बदल्‍या प्रक्रियेत २७ जुलै रोजी आरोग्‍य विभागातील गट-क व गट-ड वर्गातील कर्मचाऱ्यांच्‍या समुपदेशाने जि.प.च्या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात सकाळी १० वाजता बदली प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. २८ जुलै रोजी ग्रामपंचायत विभाग तर दिनांक ३० जुलै रोजी शिक्षण विभाग व सामान्‍य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांच्‍या बदल्‍यांचे वेळापत्रक आहे.

Web Title: Transfer of 52 employees on the first day in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.