"धोनीनं सांगितलंय तो ipl 2023 जिंकेल अन् २०२४ पर्यंत खेळेल", सुरेश रैनाचा मोठा गौप्यस्फोट

suresh raina and ms dhoni : आयपीएलचा सोळावा हंगाम मैदानात आणि मैदानाबाहेर महेंद्रसिंग धोनीमुळे सर्वाधिक चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 10:56 AM2023-05-09T10:56:38+5:302023-05-09T10:57:17+5:30

whatsapp join usJoin us
MS Dhoni Said He Will Win IPL 2023 And Play Till 2024, says former csk batter Suresh Raina   | "धोनीनं सांगितलंय तो ipl 2023 जिंकेल अन् २०२४ पर्यंत खेळेल", सुरेश रैनाचा मोठा गौप्यस्फोट

"धोनीनं सांगितलंय तो ipl 2023 जिंकेल अन् २०२४ पर्यंत खेळेल", सुरेश रैनाचा मोठा गौप्यस्फोट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ms dhoni retirement ipl | नवी दिल्ली : आयपीएलचा सोळावा हंगाम मैदानात आणि मैदानाबाहेर महेंद्रसिंग धोनीमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आयपीएलला रामराम करणार का? याकडे सर्व क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे. धोनीने मात्र अनेकदा वेगवेगळी विधानं करून सस्पेन्स कायम ठेवला आहे. धोनीने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेव्हापासून धोनी केवळ आयपीएलमध्ये खेळत आहे. धोनीचा यंदाचा हंगाम अखेरचा असल्याचा सूर असल्यामुळे चाहते त्याची झलक पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहे. 

दरम्यान, सीएसकेचा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर असो की मग मुंबईतील वानखेडेवर... सर्वत्र धोनी... धोनीचे नारे पाहायला मिळत आहेत. अनेक क्रिकेट जाणकारांनी धोनीचा हा शेवटचा हंगाम असल्याचे म्हटले आहे. अशातच आता भारताचा आणि चेन्नईचा माजी खेळाडू तसेच धोनीचा जवळचा सहकारी सुरेश रैनाने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. रैनाने खुलासा करताना म्हटले, "चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखून पराभव केल्यानंतर सामन्यानंतरच्या संभाषणात धोनीने म्हटले की, आयपीएल २०२३ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर आणखी एक वर्ष खेळण्याचा त्याचा मानस आहे." तसेच धोनी म्हणत आहे की, ट्रॉफी जिंकल्यानंतर आणखी एक हंगाम खेळायचा आहे, असे रैनाने आणखी सांगितले. 

मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून धोनीचे तोंडभरून कौतुक; IPL मधून निवृत्त न होण्याची केली विनंती

धोनीनंतर ऋतुराजकडे चेन्नईची धुरा - रैना
महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नईच्या संघाचे कर्णधारपद कोण सांभाळणार हा चर्चेचा विषय आहे. पण रैनाच्या मते, ऋतुराज गायकवाड चेन्नईचा पुढील कर्णधार असू शकतो. मराठमोळ्या ऋतुराजने आयपीएल २०२१ मध्ये अप्रतिम कामगिरी करताना ६३५ धावा केल्या होत्या. यंदाच्या हंगामात देखील त्याने आतापर्यंत ३८४ धावा केल्या आहेत. 

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईची विजयी घौडदौड
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात देखील धोनी चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करत आहे. हा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊव पोहचला आहे. चेन्नईने आतापर्यंत ११ सामने खेळले असून ६ सामने जिंकले आहेत, तर धोनीच्या संघाला ४ सामने गमवावे लागले आहेत. १३ गुणांसह चेन्नई सुपर किंग्ज आताच्या घडीला क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 
 

Web Title: MS Dhoni Said He Will Win IPL 2023 And Play Till 2024, says former csk batter Suresh Raina  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.