दोन्ही डोस नंतरही कोरोना होणाऱ्यांचे प्रमाण अधिक; नेमकं काय कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 03:58 PM2021-10-23T15:58:02+5:302021-10-23T16:00:46+5:30

दोन्ही डोसनंतर कोरोना होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले असून, यात ज्येष्ठ नागरिक अधिक आहेत

corona infection after both doses in pune aged person covid 19 | दोन्ही डोस नंतरही कोरोना होणाऱ्यांचे प्रमाण अधिक; नेमकं काय कारण?

दोन्ही डोस नंतरही कोरोना होणाऱ्यांचे प्रमाण अधिक; नेमकं काय कारण?

Next
ठळक मुद्देअनेकांना कोरोना लसीकरणानंतर देखील कोरोनाची लागण झाली आहेदोन्ही डोसनंतर कोरोना होण्याचे प्रमाण अधिक

पुणे : शहर आणि जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 1 कोटी 17 लाख 58 हजार लोकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण झाले म्हणजे आता आपल्याला कोरोनाच होणार नसल्याच्या भ्रमात असलेल्या सुमारे 26  हजार 148  लोकांना कोरोना लसीकरणानंतर देखील कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन्ही डोसनंतर कोरोना होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले असून, यात ज्येष्ठ नागरिक अधिक आहेत. यामुळेच लसीकरण पूर्ण झाले तरी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात येत आहे. 

देशाने शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला असतानाच पुणे जिल्ह्यात देखील 1 कोटी 17 लाख 58 हजार लोकांचे लसीकरण करत कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता पर्यंत तब्बल 11 लाख 25 हजार 822 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण होऊन गेला. गेल्या काही महिन्यांत लसीकरण झाल्यानंतर त्यातही कोरोनाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर लोक अधिक बेफिकीर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लसीकरण झाल्यानंतर मास्क वापरण्याची गरज नाही,  दोन डोस घेतलेल्या लोकांना मिळत असलेला युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास या सर्व गोष्टींचा परिणाम दोन्ही डोस घेणाऱ्या लोकांचे कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण अधिक वाढले. कोरोनाचा पहिला डोस घेतलेले 0.19 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर दोन्ही डोस घेतलेल्यापैकी 0.26 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये लसीकरणानंतर कोरोना पॉझिटिव्ह होणा-यामध्ये ज्येष्ठ नागरिक अधिक आहेत. 

  • कोरोना लसीकरणानंतर 26  हजार 148  लोकांना कोरोनांची लागण 
  • पहिल्या डोस नंतर 0.19 टक्के लोकांना कोरोनाची लागण 
  • दुसरा डोस घेतल्यानंतर 0.26 टक्के लोकांना कोरोनाची लागण 

 

जिल्ह्यातील लसीकरण झालेले लोक व कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण
 कार्यक्षेत्रकोरोना लसीकरणलसीकरणानंतर बाधित
पुणे मनपा4937074 11886
पिंपरी-चिंचवड218703 8135
ग्रामीण 46338096127
एकूण1175848626148

 
                    

Web Title: corona infection after both doses in pune aged person covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.