IPL 2023: "हा दिवस दुःखाचा आहे पण...", ड्वेन ब्राव्होने IPLला केलं रामराम; भावनिक पोस्ट करत दिली माहिती

ड्वेन ब्राव्होने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 04:29 PM2022-12-02T16:29:54+5:302022-12-02T16:30:17+5:30

whatsapp join usJoin us
 West Indies all-rounder Dwayne Bravo has announced his retirement from the IPL, having been part of the Chennai Super Kings team | IPL 2023: "हा दिवस दुःखाचा आहे पण...", ड्वेन ब्राव्होने IPLला केलं रामराम; भावनिक पोस्ट करत दिली माहिती

IPL 2023: "हा दिवस दुःखाचा आहे पण...", ड्वेन ब्राव्होने IPLला केलं रामराम; भावनिक पोस्ट करत दिली माहिती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने एक भावनिक पोस्ट करून याबाबत माहिती दिली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेच्या फ्रँचायझीने त्याला आयपीएल 2023 पूर्वी होणाऱ्या मिनी लिलावापूर्वी रिलीज केले होते. यानंतर अष्टपैलू खेळाडूने लिलावासाठी आपले नाव दिले नाही. अखेर आज ब्राव्होने निवृत्तीची घोषणा केली आहे. 

भावनिक पोस्ट करून दिली माहिती
ड्वेन ब्राव्होने एक भावनिक पोस्ट करून आयपीएलमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. "15 वर्ष सर्वात मोठ्या ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळल्यानंतर मी आज जाहीर करतो की मी यापुढे IPL मध्ये भाग घेणार नाही. अनेक चढ-उतारांसह हा एक उत्तम प्रवास आहे. त्याचवेळी मी मागील 15 वर्षांपासून आयपीएलचा भाग असल्याबद्दल कृतज्ञ आहे. मला माहित आहे की हा दिवस माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या चाहत्यांसाठी दुःखाचा दिवस आहे. पण त्याच वेळी गेल्या 15 वर्षांतील माझी कारकीर्द आपण सर्वांनी साजरी करावी अशी माझी इच्छा आहे. मी माझ्या चाहत्यांना हे सांगू इच्छितो की मी माझी कोचिंग कॅप घालण्यास उत्सुक आहे. मी CSK मधील युवा गोलंदाजांसोबत काम करण्यास उत्सुक आहे. मी या नवीन संधीबद्दल खरोखर उत्साहित आहे. चॅम्पियन्सच्या पुढच्या पिढीला मदत करणे आणि विकसित करणे हे आता माझे काम आहे. वर्षानुवर्षे दिलेल्या सर्व प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद."


ब्राव्होची आयपीएल कारकीर्द
ड्वेन ब्राव्होने इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 161 सामन्यांमध्ये 183 बळी घेतले आहेत आणि 130 च्या स्ट्राईक रेटने 1,560 धावा केल्या आहेत. तो चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक होता. CSK च्या 2011, 2018 आणि 2021 मध्ये IPL विजेतेपद आणि 2014 मध्ये चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 जिंकण्याचा एक भाग होता. दोन आयपीएल हंगामात (2013 आणि 2015) सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून पर्पल कॅप जिंकणारा ड्वेन ब्राव्हो हा पहिला खेळाडू होता. ड्वेन ब्राव्होने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) साठी 144 सामने खेळले असून 168 बळी घेतले आणि 1556 धावा देखील केल्या आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title:  West Indies all-rounder Dwayne Bravo has announced his retirement from the IPL, having been part of the Chennai Super Kings team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.