लोहाऱ्यात बोगस खतविक्री प्रकरणात दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 06:42 PM2018-09-18T18:42:51+5:302018-09-18T18:44:01+5:30

लोहारा पोलिसांनी मंगळवारी सकाळीच तातडीने कारवाई करून बोगस खत विक्री प्रकरणात दोघांना जेरबंद केले़ ही कारवाई तालुक्यातील वडगाववाडी, आष्टाकासार येथे करण्यात आली़

two arrested in the case of bogus fertilizer case at Lohara | लोहाऱ्यात बोगस खतविक्री प्रकरणात दोघे जेरबंद

लोहाऱ्यात बोगस खतविक्री प्रकरणात दोघे जेरबंद

googlenewsNext

लोहारा (उस्मानाबाद ) : बोगस खत विक्री प्रकरणात आरोपी फरार असल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते़ या वृत्ताची दखल घेत लोहारा पोलिसांनी मंगळवारी सकाळीच तातडीने कारवाई करून बोगस खत विक्री प्रकरणात दोघांना जेरबंद केले़ ही कारवाई तालुक्यातील वडगाववाडी, आष्टाकासार येथे करण्यात आली़

लोहारा तालुक्यात जैविक खत विक्रीच्या नावावर नामांकीत कंपनीच्या नावाच्या बॅग वापरून बोगस खते काही बचतगट व कृषी सेवा केंद्र चालकांनी विक्रीसाठी साठा करून ठेवल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी अशोक काळे यांना मिळाली होती. या माहितीवरून काळे व त्यांच्या पथकाने १४ जून रोजी तालुक्यातील वडगाववाडी येथील जय शिवा शेतकरी गट कृषी सेवा केंद्र व आष्टाकासार येथील साईनाथ कृषी सेवा केंद्रावर अचानक धाड मारली़ त्यावेळी पथकास ५४ हजार १५६ रूपये किंमतीचे झुआरी अग्रोकेमिकल्स गोवा कंपनीचे डी. ए. पी. खत ४८ बॅग, १३ हजार १६४ रूपये किंमतीचे १२:३२:३६ या नंबरच्या १२ बॅग, २० हजार ३२० रूपये किंमतीच्या १८:१८:१० व २०:२०: ० नंबर रामा कृषी रसायन पुणे या कंपनीच्या २२ बॅग असा एकूण ८७ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल मिळाला़ जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते़ 

अडीच महिन्यांनी पुणे येथील प्रयोगशाळेने अहवाल दिला़ जप्त केलेले खत बॅग या दुसऱ्या कंपनीच्या बॅग वापरून आतमध्ये बोगस खत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते़ प्राप्त अहवालानुसार कृषी अधिकारी अशोक काळे यांनी लोहारा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वडगाववाडी येथील जय शिवा शेतकरी गट कृषी सेवा केंद्राचे मालक संजय इराप्पा बचाटे व आष्टाकासार येथील साईनाथ कृषी सेवा केंद्राचे मालक शितल सुलतानपुरे या दोघांविरूध्द लोहारा पोलीस ठाण्यात २५ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हा दाखल होऊन महिन्याचा कालावधी लोटला तरी आरोपी फरार होते़ याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी ‘बोगस खत विक्रीतील आरोपी अद्याप फरारच’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते़ हे वृत्त प्रसिध्द होताच खडबडून जागे झालेल्या लोहारा पोलिसांनी मंगळवारी सकाळीच वडगाववाडी येथून संजय बचाटे व आष्टाकासार येथून शितल सुलतानपुरे यांना अटक केली़ या पथकात तपास अधिकारी पोनि सर्जेराव भंडारे, आर.एन.आडसूळ, एस.बी.साखरे आदींचा समावेश होता़

२४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
बोगस खत विक्री प्रकरणात अटक केलेल्या दोघांना लोहारा पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते़ न्यायालयाने या दोघांना २४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ या खत विक्रेत्यांना बोगस खत पुरवठा करणारे व बोगस खताची निर्मिती करणारे मुख्य सूत्रधार कोण? याची चर्चा रंगल्या असून, पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.

Web Title: two arrested in the case of bogus fertilizer case at Lohara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.