तेरमध्ये आढळले पोलिओसदृश्य बालक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 06:39 PM2019-08-21T18:39:20+5:302019-08-21T18:42:14+5:30

खबरदारीचा भाग म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने गावात विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

A polio-visible child found in Ter ? | तेरमध्ये आढळले पोलिओसदृश्य बालक?

तेरमध्ये आढळले पोलिओसदृश्य बालक?

googlenewsNext

तेर (जि.उस्मानाबाद) : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे चार वर्षीय पोलिओसदृश्य बालक आढळून आले आहे. त्यामुळे खबरदारीचा भाग म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून गावांमध्ये लसीकरण मोहीम राबविली. या माध्यमातून सव्वासातशेवर बालकांचे लसीकरण करण्यात आले. 

तेर येथील एक चार वर्षीय बालकामध्ये पोलिओसदृश्य आजार आढळून आला आहे.   संशयित पोलिओ रूग्ण म्हणून ३१ जुलै रोजी ग्रामीण रूग्णालयाकडून जिल्हा आरोग्य अधिकाºयांना अहवाल सादर केला आहे. तसेच बालकाच्या विष्ठेचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. त्यामुळे संबंधित बालकामध्ये पोलिओ आजार आहे की नाही, हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. असे असले तरी खबरदारीचा भाग म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने गावात विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. मोहिमेतून ७३८ बालकांना लस देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिओसदृश्य बालकावर आरोग्य विभागाच्या पथकाची बारीक नजर आहे. पोलिओची ठोस लक्षणे तिसताहेत का? हे नियमितपणे पाहिले जात आहे.  

अहवालाअंती स्पष्ट होईल 
२०१३ नंतर महाराष्ट्रात एकही पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे तेर येथील ‘त्या’ बालकाला पोलीओच झाला आहे, असे म्हणता येणार नाही. अहवालाअंती हे स्पष्ट होणार आहे. असे असले तरी उपाययोजनांचा भाग म्हणून आरोग्य विभागाकडून गावामध्ये विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. 
- डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी, उस्मानाबाद.

Web Title: A polio-visible child found in Ter ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.