Next

नाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 10:52 PM2018-05-22T22:52:22+5:302018-05-22T22:52:45+5:30

नाशिक - गोदामाई विषयी कृतज्ञता व्यक्त करत हजारो भाविकांनी मंगळवारी दि.२२ चांगल्या पर्जन्यसाठी साकडे घातले. निमित्त होते रामकुंडावर आयोजित ...

नाशिक - गोदामाई विषयी कृतज्ञता व्यक्त करत हजारो भाविकांनी मंगळवारी दि.२२ चांगल्या पर्जन्यसाठी साकडे घातले. निमित्त होते रामकुंडावर आयोजित गंगा दशहरा उत्सवाचे. श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी, गंगा दशहरा उत्सवानिमित्ताने रामकुंडावर गंगापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरु माउली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत हजारो सेवेकरी पर्जन्य सुक्ताचे पाठ करून  गोदावरीचे पूजन करून पर्जन्यराजास साकडे घातले.