'डान्स+4'च्या मंचावर होणार 'टोटल धमाल'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 08:30 PM2019-02-01T20:30:00+5:302019-02-01T20:30:00+5:30

'डान्स+4' या नृत्यविषयक कार्यक्रमाचा प्रवास अंतिम फेरीच्या दिशेने सुरू झाला असून स्पर्धकांच्या दर्जेदार नृत्याविष्कारामुळे प्रेक्षकांना ही अंतिम फेरी मनोरंजनाची पर्वणी ठरेल.

'Total Dhamal' will be on the stage of 'Dance + 4' | 'डान्स+4'च्या मंचावर होणार 'टोटल धमाल'

'डान्स+4'च्या मंचावर होणार 'टोटल धमाल'

googlenewsNext
ठळक मुद्दे टोटल धमालचे प्रमोशन डान्स प्लस 4च्या मंचावर

स्टार प्लसवरील 'डान्स+4' या नृत्यविषयक कार्यक्रमाचा प्रवास अंतिम फेरीच्या दिशेने सुरू झाला असून स्पर्धकांच्या दर्जेदार नृत्याविष्कारामुळे प्रेक्षकांना ही अंतिम फेरी मनोरंजनाची पर्वणी ठरेल. आता टोटल धमाल या चित्रपटाचे प्रमोशन या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत केले जाणार आहे. परिणामी या महाअंतिम फेरीत अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अजय देवगण, रितेश देशमुख वगैरे सर्व अव्वल दर्जाचे कलाकार सहभागी होणार असून ही अंतिम फेरी प्रेक्षकांसाठी एक धमाल करमणूक ठरणार आहे.


'टोटल धमाल' हा चित्रपट म्हणजे निखळ धमाल करमणूक असून त्याच्या प्रसिध्दीसाठी त्यातील सर्व कलाकार आणि निर्माते सज्ज झाले आहेत. आता अशा निखळ करमणूकप्रधान चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी ‘डान्स+4’ पेक्षा अन्य दुसरा सुयोग्य कार्यक्रम दुसरा कोणता असणार! माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर ही एकेकाळची अतिशय लोकप्रिय आणि सुपरहिट जोडी या चित्रपटात प्रदीर्घ कालखंडानंतर पुन्हा एकदा दिसणार असल्याने त्याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमात अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित दुसऱ्यांदा सहभागी झाले असून आता त्यांच्या जोडीला अजय देवगण आणि रितेश देशमुख हेही कलाकार असणार आहेत. या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत सादर करण्यात येणारी अप्रतिम नृत्ये आणि त्यात आपल्या आवडत्या स्पर्धकाला प्रोत्साहन देण्यसाठी अनेक दिग्गज नामवंतांचा सहभाग यामुळे ही अंतिम फेरी म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा महोत्सवच ठरणार आहे. २ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता डान्स+4ची अंतिम फेरी फक्त स्टार प्लसवर पाहता येईल.
 

Web Title: 'Total Dhamal' will be on the stage of 'Dance + 4'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.