दीपिका पादुकोण व रणवीर सिंग व्यतिरिक्त आहेत बॉलिवूडमधील १२ लोकप्रिय जोडी, दोघेही आहेत कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 03:56 PM2018-11-15T15:56:40+5:302018-11-15T16:07:23+5:30

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. कोंकणी व सिंधी रितीरिवाजात त्यांचा विवाह पार पडला.

सैफ अली खान व करीना कपूर: पहिली पत्नी अमृता सिंगला घटस्फोट दिल्यानंतर सैफ अली खानने करीना कपूरसोबत २०१२ साली लग्न केले. ही जोडी बॉलिवूडमधील खूप स्टाइलिश व हॉट जोडी आहे.

धर्मेंद्र देओल व हेमा मालिनीः धर्मेंद्र व हेमा यांची प्रेमकथा जगजाहिर असून दोघांनी सत्तर व ऐंशीच्या दशकात खूप लोकप्रिय होते. धर्मेंद्रने हेमासोबत १९७९ साली लग्न केले.

ऋषी कपूर व नीतू सिंग : ऋषी कपूरने नीतू सिंगसोबत १९८०मध्ये लग्न केले होते. आजही कपल चांगले जीवन व्यतित करत आहेत.

अमिताभ बच्चन व जया बच्चन: बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व सुंदर जोडीमध्ये सर्वात आधी अमिताभ बच्चन व जया बच्चन यांचे नाव येते. ३ जून, १९७३ साली जया व अमिताभ बच्चन लग्नबेडीत अडकले.

अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन: अभिषेक व ऐश्वर्याने २० एप्रिल २००७मध्ये लग्न केले आणि या दोघांच्या लग्नात जवळचे नातेवाईक उपस्थित होते.

अजय देवगण व काजोल : अजय देवगण व काजोल ही बॉलिवूडमधील सुंदर जोडी आहे. २४ फेब्रुवारी, १९९९मध्ये काजोल व अजय देवगण विवाहबंधनात अडकले.

अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना: तसे तर अक्षय कुमारचे बॉलिवूडमधील कित्येक अभिनेत्रींसोबत अफेयर होते. मात्र अक्षयने ट्विंकल खन्नाची २००१ साली जीवनसाथी म्हणून निवड केली.

नरगिस व सुनील दत्त : भलेही नरगिस व सुनील दत्त आपल्यात नाहीत. मात्र या जोडीने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मार्च १९५८साली नरगिस व सुनील दत्त यांचे लग्न झाले होते.

नेहा धुपिया व अंगद बेदी : सोनम कपूर व आनंद आहुजा यांच्यानंतर बॉलिवूडमधील आणखीन एक कपल विवाहबंधनात अडकल्याचे समोर आले होते. हे कपल म्हणजे नेहा धुपिया व अंगद बेदी. १० मे रोजी दोघांनी दिल्लीतील गुरूद्वारामध्ये लग्न केले होते.

महेश बाबू व नम्रता शिरोडकर : जवळपास चार वर्षापर्यंत महेश बाबू व नम्रता शिरोडकर यांचे अफेयर होते. त्यानंतर नम्रता व महेश बाबू यांनी १० फेब्रुवारीला लग्न केले.

कमल हसन व सारिका : कमल व सारिका यांनी १९८८मध्ये लग्न केले. त्यांना श्रुती व अक्षरा अशी दोन मुली आहेत. २००४ साली सारिकासोबत ते विभक्त झाले.

किरण ठाकर सिंग व अनुपम खेर : किरण खेर व अनुपम खेर एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर १९८५ साली लग्नबेडीत अडकले.