वरुण धवनने अशाप्रकारे घरातल्यांसोबत साजरा केला वाढदिवस, पाहा सेलिब्रेशनचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 01:57 PM2020-04-24T13:57:00+5:302020-04-24T14:00:01+5:30

वरुण धवनचा आज वाढदिवस असून तो हा वाढदिवस त्याच्या घरातल्यांसोबत सेलिब्रेट करत आहे.

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि लाली धवन यांचा वरुण मुलगा असून त्याचा जन्म 24 एप्रिल 1987 ला मुंबईत झाला.

लॉकडाऊनमुळे वरुण त्याचा वाढदिवस त्याच्या इंडस्ट्रीतील मित्रांसोबत साजरा करू शकत नाहीये. पण त्याच्या मित्रांनी त्याला सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करण जोहरने त्याच्यासोबतचा हा फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री नोरा फतेहीने खास अंदाजात वरुणला शुभेच्छा दिल्या आहेत.

वरुणच्या कुटुंबियांनी वरुणचा वाढदिवस रात्री बारा वाजताच जल्लोषात साजरा केला. घरातच त्यांनी त्याच्यासाठी छोटेसे सरप्राईज प्लान केले होते.

वरुणने नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. पण त्याला अभिनयात अधिक रस असल्याने तो बॉलिवूडकडे वळला.

२०१० मध्ये आलेल्या ‘माय नेम इज खान’ या करण जोहरच्या चित्रपटासाठी वरुणने सहायक दिग्दर्शकाचे काम केले.

वरूणने करण जोहर प्रोडक्शनच्या ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. लेकाच्या या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वडील डेव्हिड धवन कधीही त्याला सेटवर भेटायला गेले नाहीत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाची एकही फ्रेम त्यांनी पाहिली नाही.