जीव मुठीत धरून पळणाऱ्या तरुणावर चाकूनं सपासप वार; हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 04:39 PM2021-09-19T16:39:41+5:302021-09-19T16:44:23+5:30

वर्दळीच्या रस्त्यावर तरुणाची निर्घृण हत्या; पोलिसांकडून आरोपीला अटक

live video of brutal murder viral on social media accused arrested by police in uttar pradesh | जीव मुठीत धरून पळणाऱ्या तरुणावर चाकूनं सपासप वार; हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

जीव मुठीत धरून पळणाऱ्या तरुणावर चाकूनं सपासप वार; हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

googlenewsNext

मुरादाबाद: उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये एका तरुणाची भररस्त्यात चाकूनं सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरूनच अटक केली आहे.

कोणत्याही प्रकारचं पूर्ववैमनस्य नव्हतं. सगळं प्रकरण संपलं होतं, असा दावा घटनास्थळी पोहोचलेल्या मृताच्या मोठ्या भावानं केला. आरोपीला माझ्या समोर आणा. सगळं शत्रुत्वच संपवतो. मग तुम्ही किती पण ताकद लावा, अशी धमकीदेखील त्यानं दिली आहे. मृताचा मोठा भाऊ नेमकं कोणतं शत्रुत्व संपवण्याची धमकी देत आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

लाज नाही वाटत तुला? हिंदू तरुणासोबत बाईकवरून जाणाऱ्या मुस्लिम महिलेला दोघांनी रोखलं

मुरादाबादमधल्या वर्दळीच्या रस्त्यावर एका तरुणानं जाहिद नावाच्या तरुणावर धारदार चाकूनं हल्ला केल्यानंतर परिसरात खळबळ माजली. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर जाहिद तिथून जीव वाचवण्यासाठी पळू लागला. मात्र आरोपीनं त्याचा पाठलाग करत चाकूनं सपासप वार केले. जाहिद ई रिक्षा चालवायचा.

चाकू हल्ल्यात जखमी झालेला जाहिद रस्त्यावर पडला. परिसरात मोठी गर्दी जमताच आरोपीनं तिथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. पोलिसांनी त्याला अटक केली. गंभीर जखमी झालेल्या जाहिदला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. मात्र तो काहीच बोलत नव्हता.

Web Title: live video of brutal murder viral on social media accused arrested by police in uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.