महानायक अमिताभ बच्चन यांनी हाथ जोडताच अनुष्का शर्माची झाली फजिती, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 01:28 PM2017-12-27T13:28:26+5:302017-12-27T18:58:26+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन मंगळवारी (२६ डिसेंबर) मुंबई येथे ...

Anushka Sharma's embarrassment when Amitabh Bachchan joined hands, see photo! | महानायक अमिताभ बच्चन यांनी हाथ जोडताच अनुष्का शर्माची झाली फजिती, पाहा फोटो!

महानायक अमिताभ बच्चन यांनी हाथ जोडताच अनुष्का शर्माची झाली फजिती, पाहा फोटो!

googlenewsNext
रतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन मंगळवारी (२६ डिसेंबर) मुंबई येथे पार पडले. या सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी सहपरिवार उपस्थित राहून विरुष्काला शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चनही मुलगी श्वेता नंदा बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्यासोबत पोहोचले होते. अमिताभ या सोहळ्यात येताच अनुष्काच्या चेहºयावर असे काही हास्य फुलले की तिला आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात हेच कळत नव्हते. अशात तिने महानायकाचे हात जोडून स्वागत केले. विशेष म्हणजे महानायक बिग बीनेदेखील तिच्यासमोर हात जोडल्याने सगळेच चकित झाले. बिग बींच्या या अंदाजामुळे क्षणभर सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर असे काही हास्याचे फुवारे फुलले ज्यामुळे सोहळ्यात एकच रंगत निर्माण झाली. 





महानायक अमिताभ यांनी स्वत:च याबाबतचे काही फोटोज त्यांच्या ट्विटर अकाउण्टवर शेअर केले. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘विराट आणि अनुष्काला त्यांच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा!’ दुसºया ट्विटमध्ये लिहिले की, ‘रिसेप्शनमध्ये माझी सुंदर मुलगी श्वेतासोबत’, तर तिसºया ट्विटमध्ये लिहिले की, अखेर त्याची भेट झाली ज्याने आपल्याला क्रिकेटच्या मैदानावर गौरावांकित केले.  यावेळी बिग बींनी त्यांच्या तिन्ही ट्विटसोबत सोहळ्यातील काही फोटोज् शेअर केले. ज्यामध्ये विराट बाजूला उभा दिसत असून, अनुष्का आणि अमिताभ यांच्यातील बॉण्डिंग स्पष्टपणे दिसत आहे. मात्र बिग बी आणि अनुष्काचा एकमेकांसमोर हात जोडून उभे असलेला फोटो सध्या चाहत्यांकडून सर्वाधिक पसंत केला जात आहे. 







विरुष्काने गेल्या ११ डिसेंबर रोजी इटली येथे लग्न केल्यानंतर दिल्ली येथे पहिले तर मुंबई येथे दुसरे रिसेप्शन दिले. पहिल्या रिसेप्शन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती, तर दुसºया रिसेप्शन सोहळ्यात बॉलिवूडसह क्रीडा क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. त्यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांची उपस्थिती अधिक आकर्षक ठरली. 

Web Title: Anushka Sharma's embarrassment when Amitabh Bachchan joined hands, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.