जेव्हा अजितदादांना Electric Rikshaw चालवण्याचा मोह आवरत नाही; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 12:09 PM2021-08-28T12:09:02+5:302021-08-28T12:09:36+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चालवली इलेक्ट्रीक रिक्षा. व्हिडीओ झाला व्हायरल.

maharashtra deputy drives electric rikshaw baramati pune tested see viral video | जेव्हा अजितदादांना Electric Rikshaw चालवण्याचा मोह आवरत नाही; पाहा Video

जेव्हा अजितदादांना Electric Rikshaw चालवण्याचा मोह आवरत नाही; पाहा Video

googlenewsNext
ठळक मुद्देउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चालवली इलेक्ट्रीक रिक्षा. व्हिडीओ झाला व्हायरल.

बारामती : सध्या देशात Electric वाहनांची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पेट्रोल डिझेलचे वाढते दरही त्यासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. इलेक्ट्रीक वाहनांकडे आता अनेकांचा कल वाढत असल्यानं कंपन्याही मोठ्या प्रमाणात यात आता उतरताना दिसत आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही इलेक्ट्रीक वाहन चालवण्याचा मोह आवरला नाही. अजित पवार यांनी बारामतीतील पियाजो कंपनीच्या इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल घेतली. यावेळी स्वत: उपमुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रीक रिक्षा चालवली.  

शनिवारी (दि. २८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा होता. यावेळी त्यांनी पियाजिओ कंपनीला भेट दिली. यावेळी  इलेक्ट्रीक रिक्षाबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांयांनी माहिती दिली. इलेक्ट्रीक रिक्षा नेमकी चालते कशी, याचे कुतहूल उपमुख्यमंत्र्यांना देखील पडले. 


यावेळी त्यांनी या रिक्षाच्या इलेक्ट्रीक बॅटरीचे, मायलेजची चौकशी केली आणि स्वत: कंपनीच्या आवारात रिक्षा चालवून पाहिली. या घटनेचा व्हीडीओ देखील व्हायरल झाला आहे. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी इलेक्ट्रीक वाहने सोयीस्कर आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी कंपनीचे कौतुक केले. 

Read in English

Web Title: maharashtra deputy drives electric rikshaw baramati pune tested see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.