कोरोनामुळे एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:05 AM2021-04-11T04:05:27+5:302021-04-11T04:05:27+5:30

खंडाळा : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शनिवारी येथील एका कुटुंबातील कोरोनाबाधित वृद्ध आईचा व तरुण मुलाचा उपचारादरम्यान ...

Corona kills two members of the same family | कोरोनामुळे एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू

कोरोनामुळे एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू

googlenewsNext

खंडाळा : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शनिवारी येथील एका कुटुंबातील कोरोनाबाधित वृद्ध आईचा व तरुण मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर कोरोना विषाणूच्या भीतीने गावात भीतीदायक वातावरण पसरले आहे.

वीस हजार लोकसंख्या असलेल्या खंडाळा गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढू लागली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने उपाययोजना केल्या जात असल्या, तरी लोक नियमावली पाळण्यात कमी पडत असून, ते कोरोनाच्या कचाट्यात अडकली जात आहेत. खंडाळा उपक्रेंदात नोंद झाल्याप्रमाणे आतापर्यंत २६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. काही रुग्णांनी त्यावर मात केली, तर काही जण बळी पडले. मागील आठवड्यात एकाच कुटुंबातील चार जण कोरोनाबाधित झाले. उपचारादरम्यान या कुटुंबातील वृद्ध मातेचा व तिच्या तरुण मुलाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही वार्ता गावात कळताच, सर्वत्र हळ‌हळ व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दुसरीकडे आरोग्य विभागाच्या वतीने गावात लसीकरण करण्यासाठी वेग दिला जात आहे. ३२८ जणांना लस टोचण्यात आली. गावाच्या लोकसंख्येत ही आकडेवारी नगण्य असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Corona kills two members of the same family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.