Nagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय?”

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 01:18 PM2021-12-05T13:18:47+5:302021-12-05T13:19:35+5:30

नागालँडमधील घटनेवरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि गृह मंत्रालयावर टीका केली आहे.

rahul gandhi asked what exactly is hm doing when civilians security personnel not safe in own land | Nagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय?”

Nagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय?”

Next

नवी दिल्ली: भारताच्या ईशान्येकडील नागालँड राज्याच्या मोन जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कथित गोळीबारात किमान ११ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यानंतर या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गाडीमध्ये दहशतवादी असल्याच्या संशयावरून सुरक्षा दलांच्या जवानांनी कथितरित्या गोळीबार केला आणि त्यात ११ जणांचा मृत्यू झाला. यानंतर आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली असून, आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत. गृह मंत्रालय नेमके काय करत आहे, अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली आहे. 

नागालँडमधील या घटनेला मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी दुजोरा दिला. तसेच याचा निषेध करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी तातडीने घडलेल्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटेनवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि गृह मंत्रालयावर निशाणा साधला आहे. 

गृह मंत्रालय नेमके काय करत आहे?

हे हृदय पिळवटून टाकणारे आहे. भारत सरकारने खरे उत्तर दिले पाहिजे. आपल्याच भूमीत नागरिक किंवा सुरक्षा कर्मचारी सुरक्षित नसताना गृह मंत्रालय नेमके काय करत आहे, अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली आहे. दुसरीकडे अमित शाह यांनीही याबाबत ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. नागालँडमध्ये घडलेल्या घटनेचे दु:ख आहे. ज्या लोकांचा यात मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. राज्य सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेली उच्चस्तरीय एसआयटी या घटनेचा तपास करणार आहे, अशी माहिती अमित शाह यांनी ट्विटरवरून दिली.

दरम्यान, ओटिंग गावातून काही लोक एका पिकअप व्हॅनमधून घरी परतण्यासाठी रात्रीच्या सुमारास निघाले. मात्र, ते घरी पोहोचलेच नाहीत. सकाळपर्यंत ते पोहोचले नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला. तेव्हा तिरू गावानजीक पिकअप व्हॅनमध्ये ११ जणांचे मृतदेह आढळून आले. या घटनेत काही जखमी देखील असल्याचे सांगितले जात असून, मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही.
 

Web Title: rahul gandhi asked what exactly is hm doing when civilians security personnel not safe in own land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.