सई ताम्हणकरचा हॉट लूक पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड, तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 10:50 AM2019-09-16T10:50:10+5:302019-09-16T11:04:29+5:30

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे

Sai tamhankar share her hot photo on social media | सई ताम्हणकरचा हॉट लूक पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड, तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

सई ताम्हणकरचा हॉट लूक पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड, तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

googlenewsNext

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. सई सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. सई सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय ही ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते. सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते.


सईने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामला एक हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच सेक्सी दिसतेय. सईचा हा फोटो तिच्या चाहत्यांना आवडला आहे. सईच्या या फोटोवर फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव केला आहे. 


सई लवकरच वैभव तत्त्वादीसोबत 'पाँडेचेरी' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे.


सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने हिंदीमध्ये साकारलेल्या भूमिकांचे देखील तितकेच कौतुक झाले आहे. सईच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सईचा आगामी चित्रपट कधी भेटीस येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. 
 

Web Title: Sai tamhankar share her hot photo on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.