शिल्पा शेट्टीची माध्यमांविरोधात उच्च न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:07 AM2021-07-30T04:07:39+5:302021-07-30T04:07:39+5:30

मानहानीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना प्रतिबंध घालण्याची मागणी शिल्पा शेट्टीची उच्च न्यायालयात धाव मानहानीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यापासून प्रतिबंध घालण्याची ...

Shilpa Shetty's run in the High Court against the media | शिल्पा शेट्टीची माध्यमांविरोधात उच्च न्यायालयात धाव

शिल्पा शेट्टीची माध्यमांविरोधात उच्च न्यायालयात धाव

Next

मानहानीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना प्रतिबंध घालण्याची मागणी

शिल्पा शेट्टीची उच्च न्यायालयात धाव

मानहानीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यापासून प्रतिबंध घालण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पोर्नोग्राफीक फिल्म्सप्रकरणी चुकीचे वार्तांकन करून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशाप्रकारे मानहानीकारक मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या मीडिया हाऊसना वार्तांकन करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात केली आहे.

राज कुंद्रा याच्या अटकेनंतर काही मीडिया हाऊसनी त्यांची रीडरशिप व टीआरपी वाढवण्यासाठी तथ्यहीन लेख लिहिले आणि त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केले, असे शिल्पा शेट्टी हिने या दाव्यात म्हटले आहे.

तिने याप्रकरणी गुगल, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूबसह २९ जणांना प्रतिवादी केले आहे. या सर्व सोशल मीडियावरून बदनामीकारक मजकूर हटविण्यात यावा, अशी मागणी तिने केली आहे. तसेच त्यांना सशर्त माफी मागण्याचे व मानहानी म्हणून प्रत्येकी २५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी शिल्पा शेट्टी हिने केली आहे. या दाव्यावरील सुनावणी शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Shilpa Shetty's run in the High Court against the media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.