CoronaVirus Updates: देशात नव्या १० हजार ४८८ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 11:59 AM2021-11-21T11:59:46+5:302021-11-21T12:08:45+5:30

राज्यात कोरोनाचे २,२७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ६४,७४,९५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

देशभरात गेल्या २४ तासांत १० हजार ४८८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात १२ हजार ३२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत एकूण ३,३९,२२,०३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचप्रमाणे एकूण ४,६५,६६२ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. देशात आतापर्यंत ११६ कोटी ५० लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत.

राज्यात कोरोनाचे २,२७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ६४,७४,९५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात शनिवारी ८३३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात ९७,६९३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १००२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या १० हजारांवर रुग्ण उपचार घेत आहेत.

सध्या राज्यात दोन कोटी लस मात्रा उपलब्ध आहेत. याखेरीज पहिला डोस घेण्यासाठी प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ही दोन कोटी एवढीच आहे. जानेवारीत लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून हा लस मात्रेचा सर्वाधिक साठा आहे. राज्य सरकारकडून देशपातळीवर आतापर्यंत सर्वाधिक दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

राज्यात आतापर्यंत ७० टक्के लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ३८ टक्के लाभार्थ्यांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. राज्यात अजूनही २.१ कोटी लाभार्थी लसीची पहिली मात्रा घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाने मोहिमेची गती वाढविण्यासाठी लस साक्षरतेला सुरुवात केली आहे.