'भारत' चित्रपटात ह्या अभिनेत्रीची लागली वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 05:36 PM2018-08-14T17:36:18+5:302018-08-15T09:00:00+5:30

अभिनेत्री नोरा फतेहीला ‘भारत’मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे ती प्रचंड उत्साही असल्याचे पाहायला मिळत आहे.

Nora Fatehi joins Salman Khan's squad in Bharat | 'भारत' चित्रपटात ह्या अभिनेत्रीची लागली वर्णी

'भारत' चित्रपटात ह्या अभिनेत्रीची लागली वर्णी

googlenewsNext
ठळक मुद्देनोरा फतेही 'भारत'मध्ये काम करण्यास उत्सुक


बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट 'भारत'बद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता वाढली आहे. सलमान सध्या या चित्रपटाचे शूटिंग माल्टामध्ये करतो आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याविषयी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाला घेऊन कमालीची उत्सुकता आहे. अभिनेत्री दिशा पटानी या चित्रपटात हेलन यांच्या रुपात दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजले होते. त्यानंतर आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री नोरा फतेहीची या चित्रपटात वर्णी लागली आहे. नोराला पहिल्यांदाच बिग बजेट चित्रपटात झळकण्याची संधी मिळाल्यामुळे नुकतेच तिने याविषयी तिचे मत व्यक्त केले आहे.


'दिलबर' या गाण्यामुळे अभिनेत्री नोरा फतेहीला ‘भारत’मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे ती प्रचंड उत्साही असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी मी योग्य असल्याचे सलमानने म्हटले असल्याचे तिने सांगितले व पुढे म्हणाली की, 'या चित्रपटासाठी सलमान आणि अली अब्बास जफर यांनी माझी निवड केली असून चित्रपटात माझ्या वाट्याला आलेल्या भूमिकेला मी योग्य न्याय देऊ शकते असे सलमान आणि अलीला वाटते. या भूमिकेसाठी मी योग्य आहे असे त्यांनी स्वत: मला सांगितले'. दरम्यान, 'भारत'मध्ये नोरा करत असलेल्या भूमिकेबद्दल तिने फार काही सांगितले नसले तरी या चित्रपटामध्ये ती स्पॅनिश बोलताना दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान व्यतिरिक्त कतरिना कैफ, तब्बू, दिशा पटानू आणि सुनील ग्रोवर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
२०१४ साली प्रद्रशित झालेला दक्षिण कोरियाई चित्रपट 'ओड टू माई फादर'मधून प्रेरणा घेऊन 'भारत' हा चित्रपट बनवण्यात आला आहे.  'भारत' चित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. हा सिनेमा २०१९ला ईदमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Nora Fatehi joins Salman Khan's squad in Bharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.