Coronavirus : उस्मानाबाद पालिकेचा पुढाकार, नागरिकांना घरपोच मिळेल किराणा, फळे अन भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 08:51 AM2020-03-25T08:51:40+5:302020-03-25T09:02:42+5:30

नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पुढाकार घेऊन, वस्तू घरपोच देणारी यंत्रणा अवघ्या दोन दिवसांत उभी केली.

Coronavirus: Osmanabad municipality initiative, citizens will get home groceries, fruits and vegetables | Coronavirus : उस्मानाबाद पालिकेचा पुढाकार, नागरिकांना घरपोच मिळेल किराणा, फळे अन भाजीपाला

Coronavirus : उस्मानाबाद पालिकेचा पुढाकार, नागरिकांना घरपोच मिळेल किराणा, फळे अन भाजीपाला

googlenewsNext
ठळक मुद्देगर्दी टाळण्यासाठी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांचा उपक्रमघरपोच सेवा देणाऱ्या दुकानदारांची संख्या वाढत आहे

उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनावर प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. एकीकडे प्रशासन गर्द टाळण्याच्या सूचना करीत असले तरी दुसरीकडे हे चित्र कॉमन झालेय. यामुळे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पुढाकार घेऊन, वस्तू घरपोच देणारी यंत्रणा अवघ्या दोन दिवसांत उभी केली.

पुढील 21 दिवस देश लॉक डाऊन असणार आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू मिळतील की नाही या भीतीपोटी लोकांनी उस्मानाबाद शहरात किराणा, भाजीपाला दुकानावर प्रचंड गर्दी केली. ही गर्दी टाळण्यासाठी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी एक अभिनव संकल्पना अंमलात आणली आहे. त्यांनी शहरातील जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना आवाहन करून त्यांचे नाव, फोटो व मोबाईल क्रमांक मिळविला. संचारबंदीत त्यांना फिरता यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या विक्रेत्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला. आजतागायत 50 किराणा, फळ, भाजीपाला विक्रेत्यांनी अशी नोंदणी त्यांच्याकडे केवळ फोनवरूनच केली आहे. आता या विक्रेत्यांना ओळकजपत्र देऊन घरपोच सुविधा उपलब्ध करून देण्यास सूचित करण्यात आले आहे. शिवाय, त्यांची यादी शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू झाले आहे. जेणेकरून एका फोनवरून नागरिकांना त्यांना हवे असलेले साहित्य घरूनच मागविता येणार आहे. अशी व्यवस्था उपलब्ध करून देणारी उस्मानाबाद पालिका ही राज्यातील पहिलीच असावी. 

घरपोच सेवा देण्यास इच्छुक असलेल्या विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याची गरज नाही. सर्व जीवनावश्यक वस्तू त्यांना घरापर्यंत पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
-मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष, उस्मानाबाद

घरपोच सेवा देणारी दुकानदार :

 

Web Title: Coronavirus: Osmanabad municipality initiative, citizens will get home groceries, fruits and vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.