‘जेम्स बॉन्ड’ सीरिजचा 25 वा चित्रपट या तारखेला होणार रिलीज, हे असेल नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 03:08 PM2019-08-21T15:08:45+5:302019-08-21T17:53:57+5:30

25th James Bond Film: ‘जेम्स बॉन्ड’चा एक मोठा चाहता वर्ग आहे. आता ‘जेम्स बॉन्ड’ सीरिजचा २५वा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

The Title Of The New James Bond Film Is To Die For | ‘जेम्स बॉन्ड’ सीरिजचा 25 वा चित्रपट या तारखेला होणार रिलीज, हे असेल नाव

‘जेम्स बॉन्ड’ सीरिजचा 25 वा चित्रपट या तारखेला होणार रिलीज, हे असेल नाव

googlenewsNext
ठळक मुद्दे‘जेम्स बॉन्ड’सीरिजच्या या 25 व्या चित्रपटाचे शूटींग सुरु असताना अनेक वाद व अपघात झालेत.

‘जेम्स बॉन्ड’चा एक मोठा चाहता वर्ग आहे. आता ‘जेम्स बॉन्ड’ सीरिजचा २५वा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नाव काय असेल याची अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. तर आता त्याचाही खुलासा झाला आहे. होय, ‘जेम्स बॉन्ड’ सीरिजच्या 25 व्या चित्रपटाचे शीर्षक ‘नो टाइम टू डाय’ असे असणार आहे. सीरिजच्या सोशल अकाऊंटवर 30 सेकंदाचे टीजर पोस्टर करून या नावाची घोषणा करण्यात आली. भारतात 3 एप्रिल 2020 मध्ये ‘नो टाईम टू डाय’ प्रदर्शित होईल.




हॉलिवुड अभिनेता डॅनियल क्रेग हे पाचव्यांदा जेम्स बॉन्डची भूमिका साकारणार आहेत.   भारतात देखील जेम्स बॉन्डचा मोठा चाहता वर्ग असून या २५व्या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता आहे. दिग्दर्शक कैरी जॉजी फुकूनागा चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.  या चित्रपटात जेम्स बॉन्डची एक नवी कथा दाखवली जाणार आहे. जेम्स बॉन्डने निवृत्त होऊन जमैकामध्ये शांततेत आयुष्य जगत असताना सीआयएचा त्याचा जुना मित्र त्याला मदत मागतो आणि यानंतर एका अपहृत शास्त्रज्ञाला वाचवण्याचे मिशन सुरु होते, असे याचे ढोबळ कथानक आहे.
‘जेम्स बॉन्ड’सीरिजच्या या 25 व्या चित्रपटाचे शूटींग सुरु असताना अनेक वाद व अपघात झालेत. मे मध्ये शूटींग सुरु असताना डॅनियल के्रग जखमी झालेत. यानंतर त्यांना एक लहान शस्त्रक्रिया करावी लागली होती. जूनमध्ये पाईनवूड स्टुडिओत लावण्यात आलेल्या सेटवर स्फोट झाला होता. या स्फोटात सेटचे प्रचंड नुकसान झाले होते. याच महिन्यात पाईनवूड स्टुडिओच्या फिमेल वॉशरूममध्ये कॅमेरा लपवण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली होती.

 
 

Web Title: The Title Of The New James Bond Film Is To Die For

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.