एरंडोल येथे भरदिवसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:18 AM2021-07-27T04:18:31+5:302021-07-27T04:18:31+5:30

एरंडोल :येथे जुन्या धरणगाव रस्त्यालगतच्या पद्माई पार्कमध्ये सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्रवीण केदार यांच्या बंद निवासस्थानाचे कुलूप तोडून ...

All day at Erandol | एरंडोल येथे भरदिवसा

एरंडोल येथे भरदिवसा

googlenewsNext

एरंडोल :येथे जुन्या धरणगाव रस्त्यालगतच्या पद्माई पार्कमध्ये सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्रवीण केदार यांच्या बंद निवासस्थानाचे कुलूप तोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला.

अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाट तोडले असता पैसे दागदागिने व पैसे शोधण्यासाठी कपाटातील कपडेलत्ते व इतर सामान कपाटाबाहेर फेकले परंतु सुदैवाने त्यांच्या हाती काही लागले नाही असे घर मालक प्रवीण केदार यांनी सांगितले.

केदार यांच्या निवासस्थानालगत असलेल्या एका कापड दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये दोन अज्ञात चोरटे असल्याचे आढळून आले. परंतु त्यांची ओळख पटली नाही, दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या घटनेबाबत पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत काही नोंद झालेली नव्हती. मात्र घर मालक असलेले शिक्षक प्रवीण केदार यांनी चोरी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या

कारणांमुळे पद्माई पार्क परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.

Web Title: All day at Erandol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.