हॅपीचा डबल धमाका! ‘हॅपी फिर भाग जाएगी’चा ट्रेलर आला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 08:16 PM2018-07-25T20:16:00+5:302018-07-25T20:16:27+5:30

दोन वर्षांपूर्वी आलेला ‘हॅपी भाग जाएगी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अनपेक्षित यश मिळवले होते. चित्रपटाचे हेच यश पाहून मेकर्सनी या चित्रपटाचा ...

film happy phir bhag jaayegi trailor launched | हॅपीचा डबल धमाका! ‘हॅपी फिर भाग जाएगी’चा ट्रेलर आला!!

हॅपीचा डबल धमाका! ‘हॅपी फिर भाग जाएगी’चा ट्रेलर आला!!

googlenewsNext

दोन वर्षांपूर्वी आलेला ‘हॅपी भाग जाएगी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अनपेक्षित यश मिळवले होते. चित्रपटाचे हेच यश पाहून मेकर्सनी या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची घोषणा केली होती. ‘हॅपी फिर भाग जाएगी’ नामक हा सीक्वल प्रदर्शनासाठी तयार आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. हा ट्रेलर बघता, प्रेक्षकांना पुन्हा एकदा मजेदार व खुशखुशीत विनोदांनी भरलेला चित्रपट पाहायला मिळणार, याची खात्री वाटतेय.

 ट्रेलर सुरु होताच, अपहृत सोनाक्षी सिन्हाची चीनमध्ये चौकशी होताना दिसते. हा सीन काय असतो तर हॅपी अर्थात डायना पेन्टी समजून भारतातून सोनाक्षीचे अपहरण झालेले असते. यादरम्यानचे जिमी शेरगिल याचे एकापेक्षा एक विनोदी संवाद ट्रेलरमध्ये ‘जान’ आणतात. ट्रेलरमध्ये सोनाक्षी व जिमीशिवाय अपारशक्ती खुराणा, जस्सी गिल, डायना पेन्टी, अली फैजल आणि पियूष मिश्रा यांचीही झलक पाहायला मिळते. चित्रपटाच्या पहिल्या भागात डायना पेन्टी लीड रोलमध्ये होती. सीक्वलमध्ये सोनाक्षी सिन्हा हॅपी बनलेली दिसते. ‘हॅपी फिर भाग जाएगी’चा ट्रेलर आम्ही पाहिलाय. तुम्हीही पाहा आणि कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कमेंट लिहू शकता.
‘हॅपी फिर भाग जाएगी’ हा चित्रपट येत्या २४ आॅगस्टला रिलीज होतोय.

Web Title: film happy phir bhag jaayegi trailor launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.