भोकरदन नगर परिषद निवडणूक आरक्षण सोडत जाहीर; इच्छुक लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 07:12 PM2022-06-13T19:12:27+5:302022-06-13T19:13:51+5:30

आरक्षण सोडत जाहीर होताच आता निवडणूक लढवू इच्छिणारे सर्वपक्षीय उमेदवार कामाला लागले आहेत.

Bhokardan Municipal Council announces election reservation | भोकरदन नगर परिषद निवडणूक आरक्षण सोडत जाहीर; इच्छुक लागले कामाला

भोकरदन नगर परिषद निवडणूक आरक्षण सोडत जाहीर; इच्छुक लागले कामाला

Next

भोकरदन : येथील नगर परिषदच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकीसाठीचे आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (निवडणूक) ज्ञानोबा बाणापुरे व नगर परिषद मुख्याधिकारी संतोष वाघमारे यांच्या उपस्थितीत नवे भोकरदन भागातील नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात दुपारी तीन वाजता 10 प्रभागाच्या 20 जागेसाठी लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. 

यात प्रभाग क्रमांक 1 ब अनुसूचित जाती (सर्वसाधारण) व प्रभाग क्रमांक 8 अ अनुसूचित जाती (महिला) तर बाकी प्रत्येक प्रभागात अ सर्वसाधारण महिला व ब मध्ये सर्वसाधारण अशी सोडत यावेळी काढण्यात आली. सोडत पध्दतीने जाहीर झालेले आरक्षण प्रभागनिहाय पुढील प्रमाणे :-

प्रभाग क्रमांक 1 
अ -सर्वसाधारण (महिला), 1-ब-अनुसूचित जाती(सर्वसाधारण)
प्रभाग क्रं 2
2 -अ-सर्वसाधारण(महिला)
2-ब-सर्वसाधारण
प्रभाग क्रं 3
3-अ-सर्वसाधारण(महिला)
3-ब-सर्वसाधारण
प्रभाग क्रं 4
4-अ-सर्वसाधारण(महिला)
4-ब-सर्वसाधारण
प्रभाग क्रं 5
5-अ-सर्वसाधारण(महिला)
5-ब-सर्वसाधारण
प्रभाग क्रं 6
6-अ-सर्वसाधारण(महिला)
6-ब-सर्वसाधारण
प्रभाग क्रं 7
7-अ-सर्वसाधारण(महिला)
7-ब-सर्वसाधारण
प्रभाग क्रं 8
8-अ-अनुसूचित जाती(महिला)
8-ब-सर्वसाधारण
प्रभाग क्रं 9
9-अ-सर्वसाधारण(महिला)
9-ब-सर्वसाधारण
प्रभाग क्रं 10
10-अ-सर्वसाधारण(महिला)
10-ब-सर्वसाधारण

Web Title: Bhokardan Municipal Council announces election reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.