Sindhudurg District Bank : अध्यक्षपदी मनीष दळवी, उपाध्यक्षापदी अतुल काळसेकर विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 03:59 PM2022-01-13T15:59:34+5:302022-01-13T16:00:02+5:30

भाजपकडे बहुमत असल्याने ही निवड चुरशीची बनली नाही.

Sindhudurg District Bank Manish Dalvi as President, Atul Kalsekar as Vice President | Sindhudurg District Bank : अध्यक्षपदी मनीष दळवी, उपाध्यक्षापदी अतुल काळसेकर विजयी

Sindhudurg District Bank : अध्यक्षपदी मनीष दळवी, उपाध्यक्षापदी अतुल काळसेकर विजयी

googlenewsNext

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीत अपेक्षेप्रमाणे मनीष दळवी व उपाध्यक्षापदी अतुल काळसेकर यांचा विजय झाला. महाविकासआघाडीचे संख्याबळ नसतानाही त्यांनी अध्यक्ष-उपाध्यक्षासाठी अर्ज दाखल केले आहेत. मात्र भाजपकडे बहुमत असल्याने ही निवड चुरशीची बनली नाही. तर या निवडी दरम्यान महाविकास आघाडीच्या सदस्या अनिता राणे या अनुपस्थित राहिल्या होत्या.

महाविकासआघाडीकडे बहुमत नसतानाही अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे व्हिक्टर डान्टस, तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या सुशांत नाईक यांनी अर्ज दाखल केले. आयत्यावेळी कोण काय करेल आणि नेमके अध्यक्ष व उपाध्यक्ष पद कोणाच्या पारड्यात पडेल याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र असा कोणताही चमत्कार या निवडीवेळी झाला नाही.

भाजपाकडून अध्यक्षपदी आमदार नितेश राणे यांचे खंदे समर्थक मनीष दळवी यांचे, तर उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांना संधी देण्यात आली आहे. ही नावे भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुचित केली होती. त्यानुसार संबंधित दोघा उमेदवारानी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३० डिसेंबर रोजी मतदान झाले होते. दरम्यान ३१ रोजी मतमोजणी झाली होती. यात भाजपचे अकरा तर महाविकास आघाडी आठ संचालक निवडून आले होते. त्यामुळे भाजपचे बहुमत सिद्ध झाले होते. 

Web Title: Sindhudurg District Bank Manish Dalvi as President, Atul Kalsekar as Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.