एका दिवसाला आठशे क्विंटल नव्या गव्हाची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:05 AM2021-03-01T04:05:07+5:302021-03-01T04:05:07+5:30

लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील बाजार समित्यांमध्ये नवीन गव्हाची आवक सुरू झाली आहे. कमीत कमी पंधराशे ते सतराशे पन्नास ...

Eight hundred quintals of new wheat arrives in a day | एका दिवसाला आठशे क्विंटल नव्या गव्हाची आवक

एका दिवसाला आठशे क्विंटल नव्या गव्हाची आवक

googlenewsNext

लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील बाजार समित्यांमध्ये नवीन गव्हाची आवक सुरू झाली आहे. कमीत कमी पंधराशे ते सतराशे पन्नास रुपये क्विंटल नवीन गव्हाला भाव मिळत आहे. लासूर स्टेशनच्या कृउबा समितीत एका दिवसाला जवळपास सातशे ते आठशे रुपये क्विंटल नवीन गव्हाची आवक सुरू झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून लासूर स्टेशन ओळखले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांतून शेतकरी शेतमाल विक्रीसाठी येथे आणत असतात. बाजार समितीमध्ये चढाओढीने लिलाव होत असल्याने कृउबा समिती व व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे लासूर बाजार समितीचे नाव पंचक्रोशीत आहे. त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने बागायती क्षेत्र कमी होते; परंतु मागील वर्षी पाऊस समाधानकारक असल्याने यंदा गहू, कांदा पीक मोठ्या प्रमाणात आले आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळे उत्पन्नात काही अंशी घट होण्याची भीतीदेखील निर्माण झाली असून, नवीन गव्हाची आवक सुरू झाली आहे. दिवसभरात सातशे ते आठशे क्विंटल आवक सध्या सध्या सुरू झाली आहे. कमीत कमी १,५०० ते जास्तीत जास्त १,७५० रुपये क्विंटल गव्हाला भाव मिळत आहे.

-----------

गेल्यावर्षी असा होता भाव

गेल्यावर्षी फेब्रुवारी-२०२० मध्ये लासूर स्टेशन येथील कृउबा समितीत दररोज १,३३४ क्विंटल आवक होती. त्यावेळी गव्हाचा भाव १,६०० ते २,६०० रुपये भाव होता, तर सरासरी दोन हजार रुपये क्विंटल गव्हाला भाव होता. यंदा २० फेब्रुवारीपासून गव्हाची आवक सुरू झाली आहे.

Web Title: Eight hundred quintals of new wheat arrives in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.