ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 04:43 PM2021-09-12T16:43:37+5:302021-09-12T16:44:16+5:30

Balasaheb Bhilare : शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. शरद पवार यांनी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी सातारा जिल्ह्यातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणारे ते पाहिले नेते होते.

Senior leader Balasaheb Bhilare passes away | ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांचे निधन 

ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांचे निधन 

Next

पाचगणी - सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. शरद पवार यांनी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी सातारा जिल्ह्यातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणारे ते पाहिले नेते होते.

सलग सहा वेळा जिल्हा परिषदेचे सदस्यपद भूषविले होते. बाळासाहेब भिलारे यांना समाजकारणात एक विकासक तर राजकारणात किंगमेकर म्हणून ओळखले जात असे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष,पाचगणी व्यायाम मंडळाचे अध्यक्ष, राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक ते स्ट्रॉबेरी ग्रोव्हर असोसिएशनचे अध्यक्ष, सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषवली.

माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेले देशातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून भिलारला मिळालेल्या बहुमानासाठी गावकऱ्यांच्या माध्यमातून दादांनी हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरीला राजमान्यता मिळवून देण्यासाठी भिलार येथे दरवर्षी स्ट्रॉबेरी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. महाबळेश्वर तालुक्याचे १०० टक्के विद्युतीकरण, ४० गावांमध्ये यशवंत ग्रामसमृद्धी योजना राबविली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन १९९८ मध्ये आदिशक्ती, समाजभूषण, बंधुत्व, इंदिरा गांधी सदभावना, विकासरत्न, जीवनगौरव आदी पुरस्कार मिळाले.
 

Web Title: Senior leader Balasaheb Bhilare passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.