हृदयद्रावक! कोरोनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने चिमुकलीसह संपविले जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 04:52 PM2021-10-02T16:52:18+5:302021-10-02T16:59:18+5:30

Suicide Case : सात वर्षीय चिमुकलीसह गळफास घेत जीवन संपविल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.

Heartbreaker! After the death of the coronated husband, the wife ended her life with Chimukali | हृदयद्रावक! कोरोनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने चिमुकलीसह संपविले जीवन 

हृदयद्रावक! कोरोनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने चिमुकलीसह संपविले जीवन 

googlenewsNext
ठळक मुद्दे  सुजाता प्रविण तेजाळे (३६) व अनया प्रविण तेजाळे (७, दाेघी रा. सुखसागर अपार्टमेंट, विनयनगर) असे या मायलेकीचे नाव आहे.

नाशिक : "पप्पांची सतत आठवण येते, पप्पा जिकडे गेले तिकडे आपण जाऊ'' असे चिमुकलीने सांगितल्यानंतर आईने चिमुकलीसह गळफास घेत जीवन संपविले.

कोराेनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर पतीचा विरह सहन होत नसल्याने आलेल्या नैराश्यातून नाशिकमधील विनयनगर भागात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या सात वर्षीय चिमुकलीसह गळफास घेत जीवन संपविल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.
 
सुजाता प्रविण तेजाळे (३६) व अनया प्रविण तेजाळे (७, दाेघी रा. सुखसागर अपार्टमेंट, विनयनगर) असे या मायलेकीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. १) राेजी सुजाता व अनया यांनी संगनमताने चर्चा करुन आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्व चिट्ठीतून समोर आले आहे. सुजाता यांनी लिहिलेली सुसाईड नाेट पाेलिसांच्या हाती लागली असून सुजाता यांचे दीर अशाेक तेजाळे हे सुजाताच्या घरी गेले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Web Title: Heartbreaker! After the death of the coronated husband, the wife ended her life with Chimukali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.