कन्नडमध्ये प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:37 PM2019-09-24T12:37:54+5:302019-09-24T12:40:15+5:30

निवडणूक विभागाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली

Maharashtra Assembly Election 2019 : Preparation for assemble election is complete in Kannada | कन्नडमध्ये प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण

कन्नडमध्ये प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण

googlenewsNext
ठळक मुद्दे शहर एक व ग्रामीण एक, असे दोन आचारसंहिता पथकएक खिडकी कक्षातून निवडणूक काळादरम्यान विविध परवाने  देण्यात येणार

कन्नड : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक विभागाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन विधाते यांनी दिली.                                                                 

मतदारसंघात १ लाख ६५ हजार ८९० पुरुष तर १ लाख ४८ हजार ३३२ महिला, असे एकूण ३ लाख १४ हजार २२२ मतदार मतदान करणार आहेत. याव्यतिरिक्त ५३८ सर्व्हिस वोटरची संख्या आहे. मतदानासाठी कन्नडमध्ये ३०८ तर सोयगावमध्ये ४३, असे ३५१ मतदान केंद्र राहणार आहेत. या केंद्रासाठी प्रत्येकी एक बीएलओ कार्यरत राहणार आहे. निवडणूक विभागाने ४२ झोनसाठी ५० झोनल आॅफिसर, ६५ मास्टर ट्रेनर, व्हिडिओ पाहणी पथक (व्हीव्हीटी) कन्नड एक, सोयगाव एक, असे दोन, सात व्हिडिओ सर्वेक्षण पथक (व्हीएसटी), आठ फिरते सर्वेक्षण पथक (आरएसटी) कन्नडसाठी पाच, सोयगाव दोन, स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), २४ तासांसाठी कन्नड तालुक्यात  सात यामध्ये पाणपोई फाटा, भांबरवाडी नाका, नाचनवेल फाटा, सायगव्हाण फाटा, चिकलठाण-घुसूर फाटा, औराळा फाटा, आलापूर फाटा या पॉइंटचा समावेश आहे. शहर एक व ग्रामीण एक, असे दोन आचारसंहिता पथक असणार आहेत.

एक खिडकी कक्षातून निवडणूक काळादरम्यान विविध परवाने  देण्यात येणार आहते. निवडणूक विभागाने लक्ष ठेवण्यासाठी दोन फिरते पथक नेमले आहेत. आदर्श आचारसंहिता पालन करण्याबाबत सर्वांना आवाहन करण्यात आले असून निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही आक्षेपार्ह गोष्टी आढळल्यास आचारसंहिता कक्षप्रमुख ग्रामीणसाठी गटविकास अधिकारी उषा मोरे तर शहरासाठी मुख्याधिकारी नंदा गायकवाड यांना कळविण्याचे आवाहन केले. विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार स्वप्नील खोल्लम, गटविकास अधिकारी उषा मोरे काम पाहणार आहेत.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : Preparation for assemble election is complete in Kannada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.