त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे जबरदस्त यश, जिंकल्या ३३४ पैकी ३२९ जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 06:39 AM2021-11-29T06:39:45+5:302021-11-29T06:40:51+5:30

Local Body Elections In Tripura: त्रिपुरामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक यश मिळविले आहे. भाजपने ३३४ वाॅर्डांपैकी ३२९ जागांवर विजय मिळविला

BJP won the local body elections in Tripura, winning 329 out of 334 seats | त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे जबरदस्त यश, जिंकल्या ३३४ पैकी ३२९ जागा

त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे जबरदस्त यश, जिंकल्या ३३४ पैकी ३२९ जागा

Next

आगरतळा : त्रिपुरामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक यश मिळविले आहे. भाजपने ३३४ वाॅर्डांपैकी ३२९ जागांवर विजय मिळविला असून, विराेधकांना केवळ ५ जागा जिंकता आल्या आहेत. तर १४ नगरपालिकांपैकी ११ ठिकाणी सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत. आगरतळा महानगरपालिकेत विराेधकांना एकही जागा जिंकता आलेली नाही. आगरतळा महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी साेमवारी मतमाेजणी झाली. आगरतळा महानगरपालिकेतील सर्वच्या सर्व ५१ प्रभागांमध्ये भाजपने विजय प्राप्त केला. 

Web Title: BJP won the local body elections in Tripura, winning 329 out of 334 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.