जिल्ह्यात ७ वा जागतिक योग दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:22 AM2021-06-22T04:22:32+5:302021-06-22T04:22:32+5:30

उस्मानाबाद : आयुष मंत्रालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, ...

7th World Yoga Day celebrated in the district | जिल्ह्यात ७ वा जागतिक योग दिन उत्साहात साजरा

जिल्ह्यात ७ वा जागतिक योग दिन उत्साहात साजरा

googlenewsNext

उस्मानाबाद : आयुष मंत्रालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, जिल्हा योग असोसिएशन, क्रीडा भारती, विविध शाळा, महाविद्यालयांसह योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संघटनांच्या माध्यमातून घरोघरी ऑनलाईन व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यंदाच्या जागतिक योग दिनावर कोरोनाचे सावट आहे. कोविड १९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर योग दिन एकत्रित साजरा न करता ऑनलाईन पद्धतीने सोशल नेटवर्कच्या साहाय्याने योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिकाद्वारे अनेकांनी इमारतीच्या टेरेस, गॅलरी, घरोघरी, रिकाम्या जागेत योग साधना करून योग दिन साजरा केला. पतंजली योग समितीच्यावतीने ऑनलाईन हा दिवस साजरा करण्यात आला. योग सत्राचे उद्घाटन जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन परळीकर, क्रीडाधिकारी अशोक बनसोडे, नेहरू युवा केंद्र समन्वयक धनराज काळे, पतंजलीप्रमुख नितीन तावडे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी क्रीडाधिकारी कैलास लटके, चंद्रशेखर सुरवसे, अण्णा कोरपे, प्रवीण गडदे, मनोज पतंगे, नंदकिशोर ठाकरे, रविजित देढे, बोरा, शंकर गोरे, अरविंद चव्हाण, भारत हिंगमिरे उपस्थित होते. योग प्रशिक्षण योग शिक्षक राम ढेरे व अनुरथ नागटिळक यांनी दिले. ऑनलाईनचे काम प्रणव तावडे, रुद्र ढोबळे, पार्थ पताळे या मुलांनी पाहिले.

जागतिक योग दिनानिमित्त आयुष विभाग जिल्हा रुग्णालय यांच्यावतीने जिल्हा रुग्णालयात २१ मे ते २१ जून योग सत्र आयोजित करण्यात आले. या सत्राचे उदघाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावी यांच्याहस्ते करण्यात आले. सत्राचा समारोप जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन परळीकर, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी कोथळकर, डॉ. नवसीन खान, डॉ. उजमा सय्यद, भारत हिंगमिरे यांच्या उपस्थितीत झाला. या सत्रात योग शिक्षक मनोज पतंगे यांनी योग प्रशिक्षण दिले.

Web Title: 7th World Yoga Day celebrated in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.