मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेची नारायण राणेंविरोधात आंदोलने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 05:25 PM2021-08-24T17:25:47+5:302021-08-24T17:27:21+5:30

भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आपत्तीजनक वक्तव्याचे पडसाद आज मंगळवारी मीरा भाईंदर मध्ये सुद्धा उमटले.

shiv sena activists protest against narayan rane in mira bhayandar | मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेची नारायण राणेंविरोधात आंदोलने

मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेची नारायण राणेंविरोधात आंदोलने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आपत्तीजनक वक्तव्याचे पडसाद आज मंगळवारी मीरा भाईंदर मध्ये सुद्धा उमटले.  शहरात शिवसेनेच्या वतीने ठिकाणी आंदोलने होऊन राणेंचा निषेध करत गुन्हा दाखल करा अशा लेखी तक्रारी पोलिसात देण्यात आल्या.

नारायण राणे यांनी, मी असतो तर मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारली असती अश्या आशयाचे वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मीरा भाईंदर शिवसेनेने शहरात आंदोलने केली. 

आज मंगळवारी मीरारोडच्या हटकेश भागात शाखाप्रमुख महेश शिंदे सह पदाधिकारी व शिवसैनिकांनी राणे यांच्या निषेधार्थ आंदोलन केले. राणेयांचे कोंबडीचोर लिहलेले फलक दाखवून त्यावर काळे फासले. महिलांनी फलक पायदळी तुडवत चपलेने मारत आपला संताप व्यक्त केला.  काशीमीरा येथे शहरप्रमुख जयराम मेसे व शिवसैनिकांनी आंदोलन केले व पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी केली. 

भाईंदर पश्चिमेस शिवसेना शहर शाखे समोर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, गटनेत्या नीलम ढवण, महिला संघटक स्नेहल सावंत, नगरसेविका तारा घरत, पदाधिकारी प्राची पाटील आदींसह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक यांनी राणेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. कोंबडी चोर असे लिहलेले फलक घेऊन राणेंच्या प्रतिमेस जोड्याने मारून संताप व्यक्त केला. 

कोंबडीचोर नाऱ्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धार करून नारायणराव बनवत मुख्यमंत्री केले. शिवसेने मुळे मोठे झाल्याची जाणीव नसणाऱ्या राणेंना भाजपाने केवळ भुंकण्यासाठी मंत्रिपद दिले आहे का ? असा सवाल गटनेत्या नीलम ढवण यांनी केला. 
 

Web Title: shiv sena activists protest against narayan rane in mira bhayandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.