अफवांवर असे रिअ‍ॅक्ट होतात विकी कौशलचे आईवडील, त्यानेच सांगितली हकीगत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 07:00 PM2020-02-23T19:00:00+5:302020-02-23T19:00:02+5:30

विकी कौशलचे नाव काही अभिनेत्रींसोबत जोडलेले आपल्याला नेहमीच ऐकायला मिळते.

Rumors have such a reaction that Vicki Kaushal's parents, he said, are real | अफवांवर असे रिअ‍ॅक्ट होतात विकी कौशलचे आईवडील, त्यानेच सांगितली हकीगत

अफवांवर असे रिअ‍ॅक्ट होतात विकी कौशलचे आईवडील, त्यानेच सांगितली हकीगत

googlenewsNext
ठळक मुद्देविकी सांगतो, मी आता या अफवांकडे दुर्लक्ष करायला शिकलो आहे. माझे घरातले तर या अफवा ऐकून अनेकवेळा प्रचंड हसतात. एवढेच नव्हे ज्याप्रकारे वर्तमानपत्रात लिहिण्यात आलेले असते, त्या क्रिएटिव्हिटीला पण ते दाद देतात. 

विकी कौशलच्या भूत पार्ट १- द हाँटेड शीप या चित्रपटात त्याच्या चाहत्यांना त्याचे एक वेगळे रूप पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला असून सध्या याच ट्रेलरची सगळीकडे चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विकीने नुकतीच लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने एका खास गोष्टीविषयी सांगितले.

विकी कौशलचे नाव काही अभिनेत्रींसोबत जोडलेले आपल्याला नेहमीच ऐकायला मिळते. या अफवांवर विकी आणि त्याच्या कुटुंबियातील कशाप्रकारे रिअ‍ॅक्ट करतात असे विचारले असता विकी सांगतो, मी आता या अफवांकडे दुर्लक्ष करायला शिकलो आहे. माझे घरातले तर या अफवा ऐकून अनेकवेळा प्रचंड हसतात. एवढेच नव्हे ज्याप्रकारे वर्तमानपत्रात लिहिण्यात आलेले असते, त्या क्रिएटिव्हिटीला पण ते दाद देतात. 

भूतः द हाँटेड शीपच्या ट्रेलरमध्ये एक जहाज आणि त्यावर घडत असलेल्या विचित्र घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा ट्रेलर थरकाप उडवणारा असून या ट्रेलरमध्ये आपल्याला विकी कौशल, आशुतोष राणा, भूमी पेडणेकर यांना पाहायला मिळाले होते.

भूतः द हाँटेड शीप या ट्रेलरमध्ये आपल्याला एक भलेमोठे जहाज दिसत असून हे जहाज अचानक समुद्रकिनारी मिळाले आहे. या जहाजात काय आहे हे पाहाण्यासाठी एक ऑफिसवर (विकी कौशल) त्याच्या आत जातो. पण त्याच्या आजूबाजूला अनेक सावल्या, भूतं आपल्याला फिरताना दिसतात. या ट्रेलरमध्ये एक बाई आणि मुलगी दिसत असून हे कोण आहेत असा प्रश्न नक्कीच पडतो. हा ट्रेलर पाहाताना आपल्या अंगावर काटा येतो यात काहीच शंका नाही.

भूतः द हाँटेड शीप या चित्रपटाचे दिग्दर्शन भानू प्रताप सिंग यांनी केले असून धर्मा प्रोडक्शन आणि झी स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भूत हा धर्मा प्रोडक्शन आणि विकी कौशलचा पहिला हॉरर चित्रपट असून हा चित्रपट 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Rumors have such a reaction that Vicki Kaushal's parents, he said, are real

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.