टॅंकर व दुचाकीची समोरासमोर धडक, एकजण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 04:25 PM2019-06-27T16:25:32+5:302019-06-27T16:27:00+5:30

कन्नड -औरंगाबाद रस्त्यावरील बहिरगाव फाट्यावर झाला अपघात

The tanker and the two-wheeler hit in front to front, one was killed on the spot | टॅंकर व दुचाकीची समोरासमोर धडक, एकजण जागीच ठार

टॅंकर व दुचाकीची समोरासमोर धडक, एकजण जागीच ठार

googlenewsNext

कन्नड (औरंगाबाद ) : हिंदुस्थान पेट्रोलियमचे टॅंकर आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी आहे. हा अपघात कन्नड -औरंगाबाद रस्त्यावरील बहिरगाव फाट्यावर गुरुवारी (दि. २७ ) दुपारी एक ते सव्वा वाजेदरम्यान घडला.

कृष्णा साहेबराव घुगे ( ४० )रा. देवपुळ ह. मु.वडगाव कोल्हाटी हे मुलगा आदित्य कृष्णा घुगे ( १२ ) याच्यासह मोटारसायकल ( क्र. एमएच २०  सीव्ही  ४२२७ ) ने कन्नड हून औरंगाबादकडे जात होते. त्याच वेळी हिंदुस्थान पेट्रोलियमचा डिझेल टँकर ( क्र. एमएच ०४ जीसी ५८२० ) औरंगाबाद कडून कन्नडकडे जात होता. विरूध्द दिशेने धावणाऱ्या दोन्ही वाहनांची बहिरगाव फाट्यावर समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात कृष्णा घुगे हे जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा आदित्य ( १२ ) गंभीर जखमी झाला. त्याच्यावर कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले.

Web Title: The tanker and the two-wheeler hit in front to front, one was killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.