पानसरे हत्या प्रकरण : शरद कळसकरला घेऊन एसआयटीचे पथक औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:01 AM2019-06-21T00:01:29+5:302019-06-21T00:02:34+5:30

ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी म्हणून शरद कळसकर अटकेत आहे

SIT team in Aurangabad with Sharad Kalasarkar | पानसरे हत्या प्रकरण : शरद कळसकरला घेऊन एसआयटीचे पथक औरंगाबादेत

पानसरे हत्या प्रकरण : शरद कळसकरला घेऊन एसआयटीचे पथक औरंगाबादेत

googlenewsNext
ठळक मुद्देपानसरे हत्या प्रकरणाचा तपासासाठी एसआयटी औरंगाबादेत केसापुरी येथे कळसकरला नेऊन केली शेतात पाहणी

औरंगाबाद : ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील संशयित आरोपी शरद कळसकर याला घेऊन विशेष तपास पथक (एसआयटी) बुधवारी औरंगाबादेत आले होते. या पथकाने आज शरदला केसापुरी येथील त्याच्या गावी नेले आणि तेथील त्याच्या शेताची पाहणी करून पंचनामे केले. सुमारे अर्धा ते पाऊण तास हे पथक केसापुरीत होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी संशयित आरोपी शरद कळसकरला अटक केली. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने कळसकरला अटक केली होती. तेव्हापासून तो कारागृहात होता. दरम्यान, पानसरे यांच्या हत्येच्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने कळसकरला अटक केली. न्यायालयाच्या आदेशाने कळसकर सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे. एसआयटीचे निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सात ते आठ पोलिसांचे पथक कळसकरला घेऊन बुधवारी सायंकाळी औरंगाबादेत आले. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास हे पथक कळसकरचे गाव असलेल्या केसापुरी येथे गेले.

( Nalasopara Arms Haul : शरद कळसकर शस्त्र हाताळण्यात, बॉम्ब बनवण्यात पारंगत - सीबीआयचा दावा )

यावेळी पथकासोबत सरकारी पंच आणि गुन्हेशाखेचे एक उपनिरीक्षक आणि कर्मचारी होते. त्यावेळी कळसकरचे आई-वडील घरी होते. कळसकरला घेऊन त्याच्या शेतात गेले. शेताची सुमारे अर्धा तास पाहणी केली. कळसकरने या प्रकरणाशी संबंधित पुरावे डायरी आणि मोबाईल नष्ट केल्याची माहिती एसआयटीला मिळाली होती. या डायरी आणि मोबाईलचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न आज तपास पथकाने केला. मात्र, तेथे काय मिळाले, याबाबतची माहिती समजू शकली नाही. पंचनामे केल्यानंतर पथक पुन्हा गावात आले. दरम्यान, कळसकरचे आई-वडील आणि अन्य नातेवाईकांनी शरदची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: SIT team in Aurangabad with Sharad Kalasarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.